Join us  

अच्छा जी मैं हारी...., डॉ. नेनेंना सोडून कुणाची मनधरणी करतेय माधुरी दीक्षित, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 6:05 PM

Madhuri Dixit Video : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. माधुरीने पोस्ट शेअर करायची देर की ती व्हायरल झालीच समजा. सध्या माधुरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Madhuri Dixit Video: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. माधुरीने पोस्ट शेअर करायची देर की ती व्हायरल झालीच समजा. सध्या माधुरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. खास बात म्हणजे, धकधक गर्ल या व्हिडीओत डॉ. नेनेंना सोडून दुसऱ्याचीच मनधरणी करताना दिसतेय. ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना...,’असं म्हणत ती व्हिडीओमधील व्यक्तिची मनधरणी करतेय.नवरोबाला सोडून माधुरी दीक्षित कुणाची माफी मागतेय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं नाव आहे मानव कौल. माधुरी व मानवचा हा व्हिडीओ एका प्रमोशनचा भाग आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, माधुरी लवकरच डिजिटलवर डेब्यू करतेय. माधुरीची ‘द फेम गेम’  (The Fame Game)ही वेबसीरिज आज रिलीज झालीये.  सध्या   माधुरी आणि या सीरिजची टीम या सीरिजचं प्रमोशन करत आहे. हा रेट्रो व्हिडीओ याचाच एक भाग आहे.  या व्हिडीओमध्ये माधुरी रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं आहे. कुणी तिला मधुबालाची उपमा दिली आहे तर काहींनी तिला एक्स्प्रेशन क्वीन म्हटलं आहे.

या वेब सीरिजमधून जवळपास 27 वषार्नंतर माधुरी आणि अभिनेता संजय कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

‘द फेम गेम’ या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन  बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. तसेच श्रीराव यांनी या सीरिजचे कथानक लिहिलं आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितनेटफ्लिक्स