Join us  

अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 3:40 PM

अमिताभ बच्चन यांनी महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. ते मॉरिशियसला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गेले, त्यावेळेचे काही फोटो त्यांनी अपलोड केले होते.

ठळक मुद्देएका फोटोत ते गॉगल लावलेले दिसत असून त्यांचा हा अवतार त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. पण त्यांनी दुसऱ्या फोटोत शॉर्ट पँट घातली असून या फोटोत त्यांचे केवळ पायच पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना आवडलेला नसल्याचे दिसून येत आहे. एकाने लिहिले आहे की, हे पाय पाहून ते अनिल कपूरचे आहेत का असा मला प्रश्न मला पडला होता तर दुसऱ्याने म्हटले आहे की, हा फोटो डिलीट करा... तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला असा फोटो शोभत नाही.

अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी त्यांचे चाहते त्यांच्या बंगल्यासमोर नेहमीच गर्दी करतात. अमिताभ देखील आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाहीत. अमिताभ ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते त्यांच्या चित्रीकरणाचे, खाजगी जीवनातले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याचसोबत ते त्यांचे काही जुने फोटो देखील सोशल मीडियावर टाकून जुन्या आठवणींना उजाळा देतात. पण त्यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या एका जुन्या फोटोमुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली. 

अमिताभ बच्चन यांनी महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. ते मॉरिशियसला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गेले, त्यावेळेचे काही फोटो त्यांनी अपलोड केले होते. एका फोटोत ते गॉगल लावलेले दिसत असून त्यांचा हा अवतार त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

पण त्यांनी दुसऱ्या फोटोत शॉर्ट पँट घातली असून या फोटोत त्यांचे केवळ पायच पाहायला मिळत आहेत. अमिताभ यांच्या फोटोला त्यांच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते. पण त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना आवडलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या चाहत्यांनी या फोटोवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून हे लगेचच लक्षात येत आहे. एकाने लिहिले आहे की, हे पाय पाहून ते अनिल कपूरचे आहेत का असा मला प्रश्न मला पडला होता तर दुसऱ्याने म्हटले आहे की, हा फोटो डिलीट करा... तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला असा फोटो शोभत नाही.

अमिताभ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना या फोटोविषयी विचारण्यात आले होते. त्यावर हा फोटो अपलोड करून मी चूक केली अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यांनी म्हटले की, मी सगळ्यात पहिल्यांदा मॉरिशियसला गेलो होतो. त्यावेळी एका गृहस्थाने माझा हा फोटो काढला होता. त्याने हा फोटो मला नुकताच भेटून दाखवला. त्यामुळे मी हा फोटो सोशल मीडियावर टाकला. पण टाकताना त्या व्यक्तीला मी क्रॉप केले. पण हा फोटो टाकल्यामुळे लोकांनी मला चांगल्याच शिव्या घातल्या.

टॅग्स :अमिताभ बच्चन