Join us  

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2018: आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:30 PM

मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये विनय अऱ्हाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.  सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. 

‘स्टाइल में रहनेका’ हे चित्रपटातून वारंवार समाजमनावर बिंबवले जाते. कारण स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू असून इतरांना आकर्षित करण्यासाठी स्टाइल प्रभावी ठरते. अशाच महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा दैनिक लोकमतच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये विनय अऱ्हाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.  सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांसह उद्योग, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. 

मान्यवर रेड कार्पेटवर स्टाइलचा जलवा दाखवत सोहळ्यात चार चाँद लावतील. ग्लॅमर, राजकारण, समाजकारण आणि उद्यागक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. यावेळी सेलिब्रेटींसह दिलखुलास गप्पाही रंगणार आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या  या सोहळ्यात बॉलीवुड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

अंजन-कांचन करवंदीचा काटेरी मुलुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  महाराष्ट्राची ‘लोकमत’ने करून दिलेली नवी स्टाइलिश ओळख सर्वार्थाने अभूतपूर्व ठरणार आहे. विनय अऱ्हाना  प्रस्तुत  महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डच्या दैदीप्यमान सोहळ्याची शान मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साक्षीने कमालीची खुलणार आहे. एकूणच अतिशय थाटामाटात रंगणाऱ्या या शानदार सोहळ्यात स्टाइलचा एक अनोखा दैदीप्यमान सोहळा डोळे दिपवून टाकणारा ठरणार हे मात्र नक्की. यावेळी त्यांच्या स्टाइलबरोबरच त्यांनी केलेल्या त्यांच्या यशोगाथाही इतरांसाठी आदर्शवत ठरणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनसई ताम्हणकरसोनाली कुलकर्णी