Join us  

आयुष्यमान खुराना म्हणतो, इथे काही ही सुरक्षित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:24 AM

आयुष्यमान फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन फार काळ झाला नसला तरी त्याने कमी वेळात चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले ...

आयुष्यमान फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन फार काळ झाला नसला तरी त्याने कमी वेळात चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्याने त्याच्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रिशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. आयुष्यमान बोलला "सतत वेगळे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. या चित्र नगरीत काही ही सुरक्षित नाही आहे, प्रेक्षकांना आपण वेगळे काहीतरी सतत दिले पाहिजे. त्यांना नेहमीच आपल्या कडून नवीन काहीतरी बघण्याची इच्छा असते.मी फार खुश आहे की मला 'बधाई हो' सारखी चांगली पटकथा असलेला आणि श्री राम राघवन सारखे थ्रिलर चित्रपटात काम करायची संधी मिळाली, इथे आपल्याला आपले स्थान स्वतः निर्माण करावे लागते आणि हे स्थान आपण नम्रतेने आणि प्रामाणिकपणे सांभाळले तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आयुष्मानने बॉलिवूडमध्ये एंट्री 2012 साली आलेल्या विकी डोनर चित्रपटातून केली. या चित्रपटात तो यामी गौतम सोबत दिसला होता. आयुष्मान एक चांगला अभिनेता होण्याबरोबरच एक दमदार गायकसुद्धा आहे. 'शुभ मंगल सावधान आणि बरेली की बर्फी सारखे चांगले चित्रपट दिल्यानंतर आता आयुष्यमान खुराना फॅमिली ड्रामामध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक अमित शर्माच्या 'बधाई हो'चे पहिल्या टप्प्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात आयुष्यमानची अभिनेत्री अमित खानबरोबर आपला पहिला चित्रपट करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा असणार आहे. ‘बधाई हो’  हा एक फॅमिली ड्रामा आहे. या कुटुंबाला अचानक एक बातमी मिळते आणि या बातमीने अख्खे कुटुंब तणावात येतात. सगळे जण आपआपल्यापरिने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागतात,अशी या चित्रपटाची कथा आहे. अमित शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. अमितने जवळपास १ हजारांवर जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. २०१५ मध्ये आलेला अर्जुन कपूर व सोनाक्षी सिन्हाचा ‘तेवर’ हा चित्रपट अमित शर्माने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डायरेक्शन डेब्यू केला होता.