Join us

तिला तिचे आयुष्य जगू द्या ना...! कुणाबद्दल इतक्या कळकळीने बोलली पूजा भट्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:57 IST

पूजा भट्ट किती बिनधास्त आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सध्या ती जरा वैतागली आहे. कुणावर तर मीडियावर. होय, ...

पूजा भट्ट किती बिनधास्त आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सध्या ती जरा वैतागली आहे. कुणावर तर मीडियावर. होय, बहिण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सध्या मीडियात चर्चेत आहेत. हे पाहून तिचा राग अनावर होतोय. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत पूजाला आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला गेला आणि मग काय, पूजा बोलायचे ते  बोलली. तू आलियाच्या अफेअरच्या स्टोरीज कशा घेतेस? असा प्रश्न तिला विचारला गेला. यावर पूजाने बेधडक उत्तर दिले.अशा बातम्या कशा हाताळायच्या हे आम्हा भट्ट कुटुंबाला चांगल्या जमते. आलिया ही सुद्धा एक प्रगल्भ मुलगी आहे. अशा बातम्यांचा तिच्यावर काही परिणाम होत असेल असे मला अजिबात वाटत नाही. माझ्यामते, ती यशाच्या शिखरावर आहे आणि आपण त्या तरूण मुलीला तिचे हे यश आणि आनंद जगू द्यायला हवे. संपूर्ण देशाचे आणि जगाचे मनोरंजन करण्याचे आपले काम आलिया चोख बजावते आहे. त्यामुळे आपल्या खासगी आयुष्यात ती काय करते, काय नाही करत,  याबद्दल आपल्याला अडचण नसावी. हे तिचे आयुष्य आहे आणि तिच्याच पद्धतीने ते जगायचे आहे. माझ्या मते, लोकांनी तिला तिचे आयुष्य जगू द्यावे,असे पूजा म्हणाली.आता पूजाच्या या म्हणण्याचा लोकांवर किती परिणाम होईल, हे तर आम्हाला ठाऊक नाही. कारण शेवटी सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य यापूर्वी कधीच खासगी राहिले नाही़. येणा-या काळात हे झालेच तर चांगलेच आहे.  
 
ALSO READ : see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!तूर्तास आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाचे शूट सुरु झाले आणि दोघांच्याही रिलेशनशिपच्या बातम्या सुरू झाल्या. अर्थात या बातम्यांना आलिया व रणबीर दोघांनीही हवा दिली. अलीकडे दोघेही कधी नव्हे इतके एकत्र दिसू लागले आहे. सोनम कपूरच्या लग्नात एकत्र एन्ट्री करण्यापासून तर फॅमिलीसोबत एकत्र डिनर डेट करण्यापर्यंतचे दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.अलीकडे एका मुलाखतीत रणबीर आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.  ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे,’असे तो म्हणाला होता.