Join us  

 ईदच्या दिवशी ‘मन्नत’च्या बाल्कनीत शाहरुख खानसोबत दिसलेली ही व्यक्ती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 10:11 AM

पांढरा कुर्ता घातलेला  शाहरूख छोट्या अबरामसोबत ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी शाहरूखसोबत आणखी एक व्यक्ती ‘मन्नत’च्या बाल्कनीत दिसली.

ठळक मुद्देशाहरूख सध्या एका नव्या प्रोजेक्टच्या तयारीत आहे. हॅरी मेट सेजल, झीरो असे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरूखला एका हिटची प्रतीक्षा आहे.

ईदच्या दिवशी ‘मन्नत’च्या बाल्कनीत किंगखान शाहरूख खान येणार नाही,असे अपवादानेच घडते. शाहरूख बाल्कनीत येतो आणि ‘मन्नत’बाहेर उभ्या असलेल्या शेकडो चाहत्यांना हात हलवून अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा देतो. काल ईदच्या मुहूर्तावर हेच चित्र दिसले. पांढरा कुर्ता घातलेला  शाहरूख छोट्या अबरामसोबत ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी शाहरूखसोबत आणखी एक व्यक्ती ‘मन्नत’च्या बाल्कनीत दिसली. पांढरी दाढी, पांढरे केस, सुट बुट अशा थाटातील ही व्यक्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. ही व्यक्ती कोण, असा प्रश्न अनेकांना पडला.

आम्ही सांगू इच्छितो की, ही व्यक्ती कुणी सामान्य व्यक्ती नव्हती. शाहरूखसोबत ईद साजरी करणारी ही व्यक्ती होती, सुप्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट डेविड लेटरमेन.

होय, डेविडने यंदा शाहरूखसोबत ईद साजरी केली. काही दिवसांपूर्वी डेविड लेटरमेनच्या खास कार्यक्रमात शाहरुख झळकला होता. यानंतर डेविड भारतात येणार, असा अंदाज बांधण्यात आला होता. तसे घडलेही. ईदच्या खास मुहूर्तावर डेविड भारतात आला. ‘मन्नत’बाहेर शाहरूखच्या चाहत्यांची गर्दी पाहून डेविड थक्क झाला. ‘मन्नत’च्या बाल्कनीत उभ्या असलेल्या डेविडच्या चेह-यावरचे भाव सगळ्यांनीच टिपले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेविड शाहरूखसोबत एका स्पेशल शूटसाठी भारतात आला. ‘मन्नत’बाहेरची शाहरूखच्या चाहत्यांची गर्दी त्याच्या शोचा भाग असू शकते.डेविड लेटरमेनने १९८२ मध्ये ‘लेट नाईट विद डेविड लेटरमेन’ आणि ‘लेट शो विद डेविड लेटरमेन’पासून सुरुवात केली. स्टीफन कोलबर्ट, जिमी फॉलन, जिमी किमेल, न ओलिवर असे अनेक लोकप्रिय शो त्याने होस्ट केलेत.

शाहरूख सध्या एका नव्या प्रोजेक्टच्या तयारीत आहे. हॅरी मेट सेजल, झीरो असे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरूखला एका हिटची प्रतीक्षा आहे. अद्याप शाहरूखने कुठलाही नवा प्रोजेक्ट साईन केलेला नाही. पण हो, ‘मन्नत’बाहेर जमलेले चाहते बघता, शाहरूख नावाची क्रेज अद्यापही कमी झालेली नाही, हे नक्की.

टॅग्स :शाहरुख खान