जाणून घ्या,माहिरा खान व रणबीर कपूरच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 14:23 IST
अलीकडे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा दुबईतील एक व्हिडिओ चर्चेत आला होता. माहिरा खान व रणबीर कपूरच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य अखेर हे सत्य समोर आले आहे.
जाणून घ्या,माहिरा खान व रणबीर कपूरच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य!
अलीकडे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा दुबईतील एक व्हिडिओ चर्चेत आला होता. रणबीर कपूर आणि माहिरा खान दुबईत एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. या इव्हेंटमध्ये दोघांनीही अतिशय आनंदात कॅमेºयापुढे एकत्र पोझ वगैरे दिली होती. पण यानंतर अचानक माहिरा खान रणबीरपुढे चक्क हात जोडताना दिसली होती. होय, माहिरा रणबीरची हात जोडून विनवणी करतेय, असा एक बॅकस्टेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत माहिरा अतिशय चिंतेत दिसली होती. याऊलट रणबीर मात्र एकदम कूल दिसत होता. अर्थात व्हिडिओला आवाज नसल्याने, रणबीर व माहिरामध्ये नेमके कशाबद्दल बोलताहेत आणि माहिरा इतकी चिंतेत का आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण अखेर हे सत्य समोर आले आहे.ALSO READ : Raees रिलिज झाल्यानंतर महिरा खान झाली नाराज?खुद्द माहिराने हे सत्य समोर आणले आहे. या व्हिडिओत दिसतेय, तसे काहीही नव्हते. मी रणबीरला कुठलीही विनवणी वगैरे करत नव्हते. खरे तर आम्ही सिनेमावर चर्चा करत होता. राजकीय कारणामुळे मला भारतात ‘रईस’चे प्रमोशन करता आले नाही, त्याचबद्दल मी व रणबीर बोलत होतो.मी शाहरुख खानसोबत प्रमोशन करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. पण माझ्या इच्छांवर पाणी फेरले गेले. मनातल्या याच भावना हावभाव करुन मी बोलून दाखवत होते. पण व्हिडिओमध्ये मात्र वेगळेच काही दिसून आले, असा भलामोठा खुलासा माहिराने केला आहे. एकंदर काय तर ‘रईस’चे प्रमोशन करता आले नाही, हे दु:ख अजूनही माहिरा विसरू शकलेली नाही. दरवेळी तिचे हे दु:ख कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती बोलून दाखवते, हेच खरे.