Join us

​latest photoshoot: टायगर श्रॉफ इतका ‘HOT beach boy ’ तुम्ही पाहिलायं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 11:44 IST

राम गोपाल वर्माला टायगर श्रॉफमध्ये काहीही ‘हॉट’ दिसत नाही. पण या देशातल्या तरूणींना विचारा. टायगरवर जीव ओवाळून टाकणा-या अनेकजणी ...

राम गोपाल वर्माला टायगर श्रॉफमध्ये काहीही ‘हॉट’ दिसत नाही. पण या देशातल्या तरूणींना विचारा. टायगरवर जीव ओवाळून टाकणा-या अनेकजणी मिळतील. टायगर श्रॉफ एक नव्या दमाचा हॉट आणि हँडसम हिरो आहे, यात दुमत नाही. आमच्या या वाक्यावर विश्वास नसेल तर टायगरचा हा फोटो तुम्ही पाहायलाच हवा. एका लोकप्रीय मॅगझिनसाठी टायगरने अलीकडे एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधील टायगरचा अवतार पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. समुद्र किनारी टायगरचे हे फोटोशूट पार पडले. ओले कुरळे केस, हातात बिच बॉल, स्लिन्की टी शर्ट आणि मागे निळाशार अथांग समुद्र असा टायगरचा हा फोटो आहे. अर्थात हा निव्वळ ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. होय, टायगरने या मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटचे आणखी बरेच हॉट फोटो लवकरच जारी होणार आहे.सध्या टायगर श्रॉफ ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटात बिझी आहेयानंतर तो ‘स्टुडंट आॅफ दी इअर’चे शूटींग सुरु करणार आहे. यानंतर टायगरने आणखी एका चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. हा चित्रपट म्हणजे  ‘बागी2’. कालच ‘बागी2’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला.  या पोस्टरमध्ये टायगरची ‘मिल्ट्री कट’ हेअरस्टाईल, डाव्या दंडाला बांधलेला लाल कपडा आणि उजव्या हातात बंदूक सगळेच काही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.  ALSO READ : राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला म्हटले ‘बिकनी बेब’!‘बागी2’ हा चित्रपट पुढील वर्षी २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बागी2’ हा गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा सीक्वल आहे. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ अहमद खान डायरेक्ट करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या तयारीसाठी टायगर हाँगकाँगला जाणार असल्याचे कळतेय.