Join us  

अभिनेत्री लारा दत्ताला कोरोना, पालिकेकडून घर 'मायक्रो कन्टेन्मेंट झोन' म्हणून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 9:34 PM

कोरोना विषाणूच्या लाटेचा प्रभाव भारतामध्ये कमी झाला आहे. पण अजूनही भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या धोक्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

कोरोना विषाणूच्या लाटेचा प्रभाव भारतामध्ये कमी झाला आहे. पण अजूनही भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या धोक्यामुळे चिंतेत भर पडली आहे. जगभरात विविध देशांमध्ये चौथ्या लाटेनं धडक दिल्याचं बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत बोलायचं झालं तर अभिनेत्री लारा दत्ता हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अभिनेत्री लारा दत्ताकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लारा दत्ताच्या निवासस्थानाबाहेर मुंबई महापालिकेकडून मायक्रो कन्टेन्मेंट झोनचा फलकही लावण्यात आला आहे. लारा दत्ताचं घर सील करण्यात आलं आहे. दरम्यान, लारा दत्ताकडून अद्याप कोणतीही माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :लारा दत्ताकोरोना वायरस बातम्या