Join us  

Lakme Fashion Week 2020: दिव्या खोसला ठरली Oops Moment ची बळी, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 10:59 AM

गडबड झाली...

ठळक मुद्देलग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून निर्मिती व दिग्दर्शनाकडे वळलेली अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिने नुकतेच  धमाकेदार कमबॅक केले. काल मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर दिव्याचा जलवा पाहायला मिळाला. दिव्याने मोठ्या आत्मविश्वासाने रॅम्पवर एन्ट्री घेतली आणि काही पावलानंतर गडबड झाली.होय, लॅक्मे फॅशन वीकच्या 5 व्या दिवशी दिव्या रॅम्ववर उतरली. फॅशन डिझाईनर Krsna Couture साठी दिव्या शो स्टॉपर बनली. यावेळी दिव्याने फॉसिल ग्रे कलरचा सुंदर लहंगा कॅरी केला होता. त्यावर डिप फ्रंट नेकलाईन ब्लाऊज तिने घातला होता. रॅम्पवर ऐटीत रॅम्पवॉक करत असतानाच अचानक दिव्याच्या लहंग्याचे हुक तुटले. दिव्याला अंदाज आला. पण हा क्षण तिने शिताफीने सांभाळला आणि रॅम्प वॉक पूर्ण केले.  

  2004 साली अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयों’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचवर्षी ‘लव्ह टुडे’ या साऊथच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगा झाला.

लग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली. 2014 मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवत, ‘यारियां’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. 2016 मध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले.    आता ती पुन्हा एकदा अभिनयात परतण्यास सज्ज झाली आहे. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’मध्ये ती जॉनची हिरोईन म्हणून झळकणार आहे. नुकतीच ती ‘याद पिया की आने लगी’ या गाण्याच्या रिमेकमुळे चर्चेत आली होती.

टॅग्स :दिव्या कुमार