Join us  

'कर्ज' सिनेमातला अभिनेता २१ वर्षापासून बेपत्ता,मनोरुग्णालयात सुरु होते उपचार,आता कुठे आहेत राज किरण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 9:00 AM

1988 मध्ये 'एक नया रिश्ता' या सिनेमात रेखासोबत त्यांनी काम केले. 1994 मध्ये आलेल्या 'वारिस' या सिनेमा आणि शेखर सुमनच्या 'रिपोर्टर' या मालिकेत ते शेवटचे दिसले होते.

1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्ज' सिनेमात ऋषी कपूर यांच्यासह आणखी एका अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेता राज किरण यांनी सिनेमात रवी वर्मा हे पात्र साकारले होते. 1988 मध्ये 'एक नया रिश्ता' या सिनेमात रेखासोबत त्यांनी काम केले. 1994 मध्ये आलेल्या 'वारिस' हा सिनेमा आणि शेखर सुमनच्या 'रिपोर्टर' या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत राज किरण यांनी 30 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. 1982 साली स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्यासोबत 'अर्थ' या सिनेमातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

2003 पासून राज किरण बेपत्ताच आहेत. पुन्हा कधीच रुपेरी पडद्यावर झळकले नाही. राज किरण आज काय करतायेत ? कुठे राहतात ? त्यांच्याबद्दल काहीच कोणाला माहिती नाही. विशेष म्हणजे राज किरण कोणत्या स्थितीत आहेत हे त्याच्या कुटुंबियांनासुद्धा माहिती नाही. एवढेच नाही तर राज किरण जिवंत आहे की नाही हे कोणालाही माहिती नाही.

अनेकांनी तर राज किरण आता या जगात नाही असेही म्हटले होते. पण काही वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा शोध घेतला होता. राज किरण अटलांटा येथील मनोरुग्णालयातच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.राज स्वतःच्या उपचारांचा खर्च स्वतःच उचलत होते. यासाठी ते हॉस्पिटमध्येच काम करत होते.अटलांटा येथील मनोरुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले गेले. मात्र राज किरण यांच्या कुटुंबाने माहिती चुकीची असल्याचे म्हटले होते.समोर आलेल्या माहितीवर कुटुंबाने बातमीत सत्यता नसल्याचे स्पष्ट केले होते.

ऋषी कपूरच नाही तर अभिनेत्री दीप्ती नवल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून राज किरण यांचा शोध घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले होते,की "चित्रपटसृष्टीतील माझ्या एका मित्राचा शोध मी घेतेय, त्याचे नाव राज किरण आहे.त्याची काहीच माहिती मिळत नाही. तो न्यूयॉर्कमध्ये कॅब चालवत असल्याचे माझ्या कानावर आले होते. जर तुमच्याजवळ त्याची काही माहिती असेल तर मला नक्की कळवा''. असे दीप्ती यांनी म्हटले होते.

टॅग्स :ऋषी कपूरदीप्ती नवल