Join us  

Bollywood Affairs : नीलमसाठी वेडा झाला होता गोविंदा, मोडला होता सुनीतासोबतचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 4:00 PM

अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा व नीलमच्या प्रेमप्रकरणाची.

ठळक मुद्देगोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

एकेकाळी  गोविंदाच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. पण याकाळात केवळ  चित्रपटांमुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही गोविंदा सतत चर्चेत असे. होय, अनेक अभिनेत्रींसोबत गोविंदाचे नाव जोडले गेले. यातल्या एका प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. ती म्हणजे, गोविंदा व नीलमच्या प्रेमप्रकरणाची.

गोविंदा व नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी 6 सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. खरे तर पहिल्याच भेटीत तो तिच्यावर भाळला होता. पुढे तो तिच्यात गुंतत गेला अगदी सुनीताशी लग्न ठरले असतानाही.

होय, ११ मार्च १९८७ ला  गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले. पण लग्न व्हायच्या काही वर्षआधी गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. एकीकडे सुनीता आणि दुसरीकडे नीलम अशी त्याची अवस्था झाली होती.  त्या काळात नीलमशिवाय गोविंदाच्या मनात दुसरा कुठलाही विचार नव्हता अगदी होणा-या पत्नीसमोर म्हणजेच सुनीतासमोर तो नीलमची प्रशंसा करताना थकत नसे. एवढेच नाही तर तू सुद्धा नीलमसारखी बन, असेही तो सुनीताला म्हणायला. सुनीता यावर प्रचंड चिडायची.

एकदा असेच झाले. पण यावेळी रागाच्या भरात सुनीता नीलमबद्दल असे काही बोलली की, गोविंदा संतापला. कारण गोविंदा नीलमबद्दल एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. झाले, यावरून त्याचे व सुनीताचे कडाक्याचे भांडण झाले. इतके की, गोविंदाने सुनीतासोबतचा साखरपुडाही मोडला. पण एवढे करूनही नीलम गोविंदाची होऊ शकली नाही.

गोविंदाच्या वडिलांना नीलम आवडत होती. त्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. पण गोविंदाच्या आईचा या लग्नाला कडाडून विरोध होता. कारण  गोविंदासाठी सुनीताला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर  गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. यानंतर 2011 मध्ये नीलमने समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली.

टॅग्स :गोविंदा