Join us

​प्रागनंतर किंग खान आता अ‍ॅमस्टरडॅमकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 12:02 IST

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘द रिंग’(तात्पुरते नाव) सिनेमाची प्रागमध्ये शूटींग पूर्ण झाली आहे.

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘द रिंग’(तात्पुरते नाव) सिनेमाची प्रागमध्ये शूटींग पूर्ण झाली आहे. पुढचे चित्रिकरण अ‍ॅमस्टरडॅमला होणार असल्यामुळे शाहरुख खान-अनुष्का शर्मा व टीम तिकडे रवाना झाले आहेत. शूटींग दरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताहेत. युरोपातील किंग खानचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सेटच्या आसपास घुटमळत असल्याचे क्रू मेंबर्सनी सांगितले. शाहरुख चित्रपटात एका गाईड तर अनुष्का गुजराती मुलीच्या भूमिकेत आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’ या दोन सिनेमांनंतर अनुष्का-शाहरुखचा हा तिसरा चित्रपट असणार आहे.मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘तमाशा’ हा इम्तियाज अलीचा शेवटचा चित्रपट होता. किंग खानसोबत काम करण्याची बºयाच वर्षांपासून इच्छा होती. ‘द रिंग’च्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे म्हणून तो जाम खुश आहे.