Join us

​ किंगखान शाहरूख खानच्या ‘रेड चिल्लीज’वर पालिकेचा हातोडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:01 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान तसे तर प्रत्येक नियम पाळतो. सरकारी नियमांचे पालन करतो. पण यावेळी मात्र त्याने नियम पाळण्याचा ...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान तसे तर प्रत्येक नियम पाळतो. सरकारी नियमांचे पालन करतो. पण यावेळी मात्र त्याने नियम पाळण्याचा स्वत:चाच नियम तोडगा. मग काय, मुंबई महापालिकेने त्याला चांगलाच दणका दिला. आता हे प्रकरण काय, ते जरा समजून घेऊ. प्रकरण आहे, गोरेगाव पश्चिम भागातील शाहरूखच्या  ‘रेड चिल्लीज वीएफएक्स’ या प्रॉडक्शन हाऊसमधील अवैध बांधकामाचे. डीएलएच इनक्लेव्ह इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शाहरुखच्या ‘रेड चिल्लीज’चे कार्यालय आहे. इमारतीच्या गच्चीचे रुपांतरण कार्यालयातील कर्मचा-यांसाठी उपहारगृह म्हणून करण्यात आले होते. हे बांधकाम अनधिकृत असल्याने अखेर पालिकेने त्यावर  हातोडा चालवला.गच्चीवरील उपहारगृहाला अद्याप पालिकेने मंजुरी दिलेली नाही, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून  या इमारतीच्या गच्चीवर दोन हजार चौरस फूट जागेवर उपहारगृह उभारण्यात आले होते. ‘रेड चिल्लीज’ या प्रॉडक्शन हाऊसची मालकी शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खान यांच्याकडे आहे.   गोरेगाव पश्चिम येथी एस व्ही रोडवर या कंपनीचे प्रशस्त कार्यालय आहे. ‘रेड चिल्लीज एफ एम’चे कार्यालयही याच ठिकाणी आहे. येथील कर्मचा-यांसाठी उपहारगृह नसल्याने हे हॉटेल बांधण्यात आले होते, असे समजते.  पालिकाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ‘रेड चिल्लीज’ने टेरेस केफेटेरिया बनवल्याची तक्रार मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.ALSO READ : शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!! दरम्यान ‘रेड चिल्लीज’च्या प्रवक्त्याने मात्र गच्चीवर उपहार गृह असल्याचा इन्कार केला आहे. ही मालमत्ता ‘रेड चिल्लीज’च्या मालकीची नसून आम्ही ती भाडेतत्वावर घेतली आहे. कार्यालयाबाहेर असलेल्या खुल्या जागेत कर्मचारी जेवायला बसायचे. आम्ही तेथे उपहारगृह उभारले नव्हते. गैरसमजुतीमुळे पालिकने इमारतीचा भाग उध्वस्त केला आहे. या भागात ऊर्जा बचतीसाठी वापरले जाणारे सोलार पॅनल होते. वीएफएक्सच्या संपूर्ण कार्यालयासाठी त्याचा वापर होत होता. याप्रकरणी रेड चिलीज व्हीएफएक्सने संबंधित अधिका-यांशी पालिकेकडे संपर्क साधला आहे, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.यापूर्वी २०१५ मध्ये महापालिकेने शाहरूखच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर बांधलेला रँप अनिधिकृत असल्याचे सांगात तोडला होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिकेने ही कारवाई केली होतर.