Join us  

किम शर्मा अभिनेता अमित सादला करतेय डेट?, अभिनेत्रीने दिली पहिली रिअ‍ॅक्शन

By गीतांजली | Published: November 13, 2020 1:55 PM

किम शर्मा आपल्या लव्ह लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते.

अलीकडे किम शर्मा अभिनेता अमित साद आणि तिच्या पालकांसोबत डिनर करत होती अशी बातमी आली होती. किम शर्मा अमित सादला डेटिंगच्या करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच किम शर्माचे हर्षवर्धन राणेसोबत ब्रेकअप झाले होते. दोघे एकमेकांना जवळपास एक वर्षे डेट करते होते. किम आणि हर्षवर्धन राणेची लव्हस्टोरी 2018मध्ये सुरु झाली होती. 

किम शर्मा आपल्या लव्ह लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अमित साद आणि किम शर्मा गोव्यात एकत्र डिनर करत होते. त्यानंतर दोघ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.  जागरणच्या रिपोर्टनुसार किम अफेअरच्या बातम्यांवर पूर्ण विराम लावत ती अमित सादला डेट करत नसल्याचे सांगितले आहे. 

किमनेही सांगितले की अमित सादसोबत तिची ही पहिली भेट होती. त्यामुळे अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.किमसोबतच्या ब्रेकअपसाठी हर्षवर्धनने स्वत:ला जबाबदार ठरवले. आमच्या नात्यात जी काही गडबड झाली ती माझ्या ‘डीएनए’मुळे झाली, असे हर्षवर्धन म्हणाला.‘किम आयुष्यात येण्याआधी जवळपास 12 वर्षे मी सिंगल होतो. यामागे काही कारण होते. कारण नसल्याशिवाय काहीही घडत नाही. यानंतर किम आयुष्यात आली. मी तिला डेट करू लागला. ती पृथ्वीवरची सर्वात फन लव्हिंग महिला आहे. मी तिच्यासोबत खरोखर खूप मस्त वेळ घालवला. पण एका वळणावर हे नाते संपले. यासाठी मी स्वत:ला दोष देईन. माझा डीएनए यासाठी जबाबदार आहे.

टॅग्स :किम शर्माअमित संध