Join us  

Kiara Sidharth: लग्नानंतर शशांक खेतानच्या चित्रपटात एकत्र दिसणार सिद्धार्थ-कियारा, लवकरच सुरू होणार शूटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 2:26 PM

रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील आवडत्या कपलपैकी एक आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजस्थानमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. तर दुसरीकडे त्यांना पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात एकत्र बघायचे आहे. 'शेरशाह'मध्ये आपल्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लोकांची मनं जिंकणार सिद्धार्थ-कियारा लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार असल्याचे दिसते. चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार आहे, दोघांना एका चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट शशांक खेतानचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे.

बॉलिवूडलाईफच्या रिपोर्टनुसार, कियारा आणि सिद्धार्थ लवकरच शंशाक खेतान या सिनेमाची घोषणा करणार आहेत. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा एकत्र काम करण्यास तयार आहेत. या चित्रपटात दोघेही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दिसणार आहेत. जुलै महिन्यात ते चित्रपटासाठी वर्क शॉप सुरू करणार आहेत. हे वर्कशॉप नंतर  ऑगस्टमध्ये शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सिद्धार्थने एका मुलाखतीत संकेत दिले होते की तो पुन्हा कियारासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि लवकरच त्याची घोषणा करेल. दरम्यान, कियारा अडवाणी सध्या कार्तिक आर्यनसोबत तिच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी मेकर्सने त्याचा टीझर रिलीज केला होता, ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ब्लॉकबस्टर 'भूल भुलैया 2' नंतर कियारा आणि कार्तिकचा हा दुसरा चित्रपट आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित सत्यप्रेम की कथा हा चित्रपट २९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच त्याची पहिली वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स' आणि 'योद्धा' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :सिध्दाराम म्हेत्रेकियारा अडवाणी