Join us  

अशी असणार केजीएफ 2’ची कथा? प्रदर्शनाआधी लीक झाली कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 5:24 PM

केजीएफ या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथून केजीएफ २ या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे.

ठळक मुद्देकेजीएफ या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथून केजीएफ २ या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. चित्रपटाच्या अखेरीस रॉकीच्या आईचे निधन झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते.

कन्नड सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ 2’ या आगामी सिनेमाचा जबरदस्त टीजर तुम्ही पाहिला असेलच. तूर्तास सोशल मीडियावर या टीजरने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इतका की, रिलीजनंतरच्या अवघ्या 24 तासांत या टीजरला युट्यूबवर 7 कोटींवर व्ह्युज मिळालेत. पहिल्या दोनच तासांत 15 लाख लोकांनी टीजर पाहिला. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधी या चित्रपटाच्या निर्मात्यांना धक्का बसला आहे. या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.

केजीएफ या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथून केजीएफ २ या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. चित्रपटाच्या अखेरीस रॉकीच्या आईचे निधन झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. आईच्या निधनाआधी रॉकीने आईला वचन दिले होते की, तो एक गरीब म्हणून मरणार नाही तर तो खूप सारे पैसे कमवणार... आता केजीएफ २ मध्ये रॉकी मोठा झाला असून त्याला सोन्याच्या व्यवसायावर राज्य करायचे आहे. राजकारणी त्याला कशाप्रकारे फसवत आहेत याची देखील त्याला जाणीव आहे. त्याला आपल्या शत्रूंचा नाश करायचा आहे. पण त्याच्या या मार्गात रवीना टंडन आडवी आली आहे. 

केजीएफ २ च्या टीझरमध्ये यश अर्थात रॉकीच्या बालपणीची झलक पाहायला मिळतेय. रॉकीच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला, हे सुरुवातीला दिसते. या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडनचीही झलक पाहायला मिळते. ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत दिसते. संजय दत्तचा जबरदस्त अवतार देखील या टीझरमध्ये दिसतोय. सुपरस्टार यशची एंट्री एकदम स्टाईलमध्ये असून ती त्याच्या फॅन्सना खूप आवडत आहे.

केजीएफ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘केजीएफ’च्या सिक्वलमध्ये यशशिवाय संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :केजीएफ