कॅटरिना कैफचा ‘हा’ हॉट व्हिडीओ होतोय वाऱ्यासारखा व्हायरल, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 14:29 IST
अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कॅटरिना खूपच हॉट दिसत आहे.
कॅटरिना कैफचा ‘हा’ हॉट व्हिडीओ होतोय वाऱ्यासारखा व्हायरल, पाहा व्हिडीओ!
आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कॅटरिना कैफ प्रचंड मेहनत घेताना बघावयास मिळत आहे. ज्या पद्धतीने कॅटचे चित्रपटाच्या सेटवरून फोटोज् आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते. वास्तविक कॅटरिना नेहमीच तिचे हॉट फोटोज् आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. आता असाच काहीसा तिचा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये कॅटचे जलवे बघण्यासारखे आहेत. हा व्हिडीओ स्वत: कॅटरिनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कॅट खूपच हॉट दिसत आहे. विशेष म्हणजे कॅटचा हा फोटो तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात असून, त्यावर कॉमेण्ट आणि लाइक्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कॅटचा हा व्हिडीओ तिच्या एखाद्या चित्रपटाचा असेल? परंतु हा व्हिडीओ तिच्या चित्रपटाचा नसून एका जाहिरातीच्या शूटिंगचा आहे. जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सुपरस्टार सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये झळकलेली कॅटरिना सध्या दोन मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कॅटरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. अशात तिच्या या दोन्ही चित्रपटांकडून तिला प्रचंड अपेक्षा आहेत. सध्या ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबतही ती ‘झीरो’ या चित्रपटाची शूटिंग करीत आहे. तिचा हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.