Join us  

​जगातील ‘या’ देशात कॅटरिना कैफ साजरा करणार तिचा वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2017 6:09 AM

हे वर्ष कॅटरिना कैफसाठी खरोखरच आनंदाचे वर्ष आहे. कारण या वर्षात कॅटरिनाकडे मोठ मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आहे. याशिवाय तिच्यासोबत ...

हे वर्ष कॅटरिना कैफसाठी खरोखरच आनंदाचे वर्ष आहे. कारण या वर्षात कॅटरिनाकडे मोठ मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आहे. याशिवाय तिच्यासोबत सलमान खान आहे. होय, सगळ्यात जुना आणि सगळ्यांत चांगला मित्र सलमान खान. आता इतका चांगला मित्र परत मिळाल्यावर कॅटरिना आपला येता वाढदिवस भारतातच साजरा करेल, असे आम्हाला वाटले होते. पण कदाचित असे नाहीय. होय, येत्या १६ जुलैला कॅटरिनाचा वाढदिवस आहे. आपला हा वाढदिवस कॅटरिना कुठे साजरा करणार, याबाबत उत्सुकता होती. कॅटरिनाने आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले. कॅट आपला येणारा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करणार आहे. कॅटरिना न्यूयॉर्कमध्ये इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमीत आयोजित सोहळ्यात भाग घेणार आहे. १५ जुलैला मेटालियम स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. कॅटरिनाने सुमारे पाच वर्षांपासून या अ‍ॅकेडमीत परफॉमर्न्स दिलेला नाही. यावर्षी मात्र हा योग आला आहे आणि याठिकाणी कॅटरिना आपला वाढदिवस साजरा करणार आहे.कॅटरिनाने यावेळी सांगितले की, न्यूयॉर्क हे माझे आवडते शहर आहे. हे शहर जादुई शहर आहे. मी येथे परफॉर्मन्स करण्यास आणि इथले जेवण खाण्यास प्रचंड उत्सूक आहे. इतक्या सर्व ग्लोबल फॅन्ससमोर परफॉर्मन्स करण्यास मी प्रचंड उत्सूक आहे.ALSO READ : ​सलमानसोबत नाही तर ‘फ्यूचर टायगर्स’सोबत वर्कआऊट करतेयं कॅटरिना कैफ!न्यूयॉर्क हे कॅटरिनाचे खरोखरीच आवडीचे शहर आहे.   एक्स बॉयफ्रेन्ड  रणबीर कपूरसोबत कॅटरिनाने न्यूयॉर्कमध्येच नव वर्ष साजरे  केले होते. या शहरासोबत कॅटरिनाच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. रणबीर व कॅटरिनाने याठिकाणी एक घर खरेदी केल्याची बातमीही मध्यंतरी आली होती. पण आता रणबीर व कॅटरिना यांचे ब्रेकअप झाले आहे. तूर्तास कॅटरिना सलमानसोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. याशिवाय रणबीरसोबतचा तिचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.