काश्मीरमधील शूटींग कबीरने पुढे ढकलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:53 IST
कबीर खान आणि सलमान खान ‘बजरंगी भाईजान’ नंतर पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. चित्रपटाची शूटींग काश्मीर ...
काश्मीरमधील शूटींग कबीरने पुढे ढकलले...
कबीर खान आणि सलमान खान ‘बजरंगी भाईजान’ नंतर पुन्हा एकदा ‘ट्युबलाईट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. चित्रपटाची शूटींग काश्मीर आणि बाजूच्या परिसरात करण्यात येणार आहे. चित्रपटाची प्रोडक्शन टीम जुलै २५ ला लडाख येथे पहिल्या सीन्सचे शूटींग करणार आहे. पण लगेचच ते मुंबईला परतणार आहेत.शूटींगची परवानगी न मिळाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सध्या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. चित्रपटाचे कथानक हे १९६२ च्या ‘सिनो-इंडियन वॉर’ वर आधारित आहे.म्हणून चित्रपटासाठी लडाख आणि काश्मीर हे ठिकाणं निवडण्यात आली आहेत. यात सोहेल खान हा सलमान खानच्या भावाची भूमिका करणार आहे.