Join us  

सेटवर करिनाला ‘मॅम’ म्हणायचा सैफ अली खान; मग कशी सुरु झाली ‘सैफिना’ची लव्हस्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:49 AM

करिना कपूर व सैफ अली खान दोघांनीही अनेकवर्ष एकमेकांना डेट केले, लिव्ह-इनमध्ये राहिले आणि नंतर लग्न केले. ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधी मात्र सीन थोडा वेगळा होता.

ठळक मुद्देकरिनाचे मानाल तर, या नात्यात तिनेच पुढाकार घेतला होता. तिने पहिल्यांदा सैफसमोर प्रेम व्यक्त केले तेव्हा क्षणभर सैफलाही विश्वास बसेना.

करिना कपूर(Kareena kapoor) व सैफ अली खान (Saif Ali Khan) हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहे. दोघांची लव्हस्टोरीही इतकी अनोखी आहे की, आजही या लव्हस्टोरीची चर्चा होते. दोघांनीही अनेकवर्ष एकमेकांना डेट केले, लिव्ह-इनमध्ये राहिले आणि नंतर लग्न केले. ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधी मात्र सीन थोडा वेगळा होता. होय, सैफ अली खान करिनाला चक्क ‘करिना मॅम’ म्हणून बोलत होता.

करिना व सैफची पहिली भेट विशाल भारद्वाज यांच्या ‘ओंकारा’च्या सेटवर झाली होती. या सिनेमात सैफने लंगडा त्यागीची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर सैफ व करिना पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा सैफ दुस-या मुलीला डेट करत होता आणि करिनाही शाहिदच्या प्रेमात होती. त्यामुळे सेटवर सैफ व करिना अगदी क्वचित बोलत. केवळ हाय-हॅलो इतके जुजबी.खरे तर ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या सेटवर करिना व सैफची ओळख झाली होती. ती बहीण करिश्मा व सैफसोबत जोधपूरमध्ये खूप फिरली होती. पण ‘ओंकारा’च्या सेटवर करिना पुन्हा भेटली तेव्हा, सैफ तिच्याशी बोलणे टाळायचा.करिनाने एका जुन्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. तिने सांगितले होते की, ‘ओंकाराच्या सेटवर सैफ व माझ्यात केवळ फॉर्मल चर्चा व्हायची. तो मला फक्त गुड मॉर्निंग मॅम म्हणत विश करायचा.’

करिनानेच घेतला होता पुढाकार...करिनाचे मानाल तर, या नात्यात तिनेच पुढाकार घेतला होता. तिने पहिल्यांदा सैफसमोर प्रेम व्यक्त केले तेव्हा क्षणभर सैफलाही विश्वास बसेना. ही काय बोलतेय, अशी त्याची भावना होती. तिने सांगितले होते,‘सैफ असा पुरूष आहे, ज्याच्या कुणीही प्रेमात पडेल. तो एकदम जेंटलमॅन आणि आपल्याच कोशात वावरणारा आहे. तो कधीच स्वत:कडून कोणत्याही महिलेच्या जवळ जाणार नाही. मी स्वत: पुढाकार घेतला आणि आमचे रिलेशनशिप पुढे गेले.’ 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान