Join us

करीना कपूर खानने 'या' दिग्दर्शकचा चित्रपट करण्यास दिला नकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 17:22 IST

करिना कपूर खान नुकतीच स्वित्झर्लंवरुन व्हेकेशन एन्जॉय करुन परतली आहे. करिना कपूर लवकरच तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'च्या ...

करिना कपूर खान नुकतीच स्वित्झर्लंवरुन व्हेकेशन एन्जॉय करुन परतली आहे. करिना कपूर लवकरच तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वीरे दी वेडींगनंतर करिना दिग्दर्शक ओमांग कुमारच्या नव्या बायोपिकमध्ये दिसणार होती. सूत्रांच्या माहितीनुसार करिना आणि ओमांग गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा करत होते. नुकतीच या चित्रपटासंदर्भात आणखीन एक बातमी कानावर आली आहे करिना कपूरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.      डीएनएच्या रिपोर्टनुसार करिना कपूरने अत्यंत विचारपूर्वक या चित्रपटापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करिना कपूरला चित्रपटाची स्क्रिप्ट अजिबात आवडली नव्हती त्यामुळे तिने ओमांगला चित्रपटासाठी नकार दिला आहे. सध्या करिना फक्त चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचते आहे मात्र कोणतीही स्क्रिप्ट तिने अजून फायनल केलेली नाही. सध्या करिनाकडे फक्त 'वीरे दी वेंडिग' हा एकच चित्रपट आहे. ओमांग कुमारला करिनाने नकार दिल्यामुळे या चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीचा शोध घ्यावा लागणार आहे. आता करिनापासून सुरु झालेला ओमांगचा हा शोध कोणत्या अभिनेत्रीवर जाऊन संपतो हे पाहाण्यासाठी थोडा वेळा थांबावे लागणार आहे.  ALSO READ : ​मॉम-डॅडसोबत पहिल्या फॉरेन ट्रीपवरून परतला तैमूर अली खान! करिना कपूर सप्टेंबरमध्ये वीरे दी वेडिंगची शूटिंग सुरु करणार आहे. ज्यात तिच्यासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षींपासून रखडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनम कपूरची बहिण रिया कपूर करणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करतेय. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.