Join us  

करीना कपूर पतौडी पॅलेसच्या नाही तर मैत्रीणीच्या फार्महाऊसच्या प्रेमात, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:46 PM

लोनावळ्यातील फार्महाऊस जितके आलिशान तितकेच भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. यावरुनच नताशा पुनावालाच्या आलिशान आयुष्याचाही तुम्हाला अंदाज आलाच असेल.

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. मात्र आज आपण करिनाची खास मैत्रीणीविषयी खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

कारण सध्या करिनाची मैत्रीणीचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळतंय. नेहमीच सोशल मीडियावर दोघींचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. फोटो पाहून ब-याच जणांना तिला ओळखले तर काहींना तिच्याविषयी फारशी माहिती नाही. 

करिनाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे नताशा पूनावाला. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या सीईओ आदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला हटके फॅशनसाठी ओळखली जाते.  भारतासह जगभरातील टॉप डिझाइनरच्या कपड्यांचे कलेक्शन त्यांच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळते.

नताशाचे फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. आलिशान असे हे फार्महाऊस कोणत्या महलपेक्षा कमी नाहीय, इतका तो आलिशान आहे.लोनावला मध्ये हे फार्महाऊस असून २४७ एकरमध्ये पसरलेले आहे.

 

सुजैन खाननेच या फार्महाऊसचे इंटिरिअर केले आहे. सजावटीच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी आकर्षक आहे. लोनावळ्यातील फार्महाऊस जितके आलिशान तितकेच भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील.

यावरुनच नताशा पुनावालाच्या आलिशान आयुष्याचाही तुम्हाला अंदाज आलाच असेल. अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींसह ती पार्टी एन्जॉय करताना दिसते. नताशा दिसायला खूप सुंदर असून सौंदर्यांच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.ब-याचदा नताशा करिना, मलायका, करिश्मा यांच्यासह मजा मस्ती करताना दिसते. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कुटुंबियासोबत इथं येतात. 

मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी नताशाच्या नावाने प्रॉपर्टी आहेत. पुण्यात आलिशाना बंगला असून ७५० कोटी इतकी त्याची किंमत आहे.मुंबई, पुणे आणि लोनावळा प्रत्येक ठिकाणी असलेले घर तितकेच आलिशान आहेत.  

टॅग्स :करिना कपूर