Join us  

करिनाच्या ख्रिसमस पार्टीला ग्लॅमरचा तडका, अर्पिता खानच्या पार्टीत बच्चेकंपनीची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 10:35 AM

पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आज देशभर नाताळ साजरा होतोय. काल मंगळवारी मध्यरात्रीपासून नाताळच्या उत्साहाला उधाण आले. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मध्यरात्री नाताळ जल्लोषात साजरा केला. करिना कपूर आणि सैफ अली खान, सलमान खानची बहीण अर्पिता खान यांनी नाताळनिमित्त खास ख्रिसमस  पार्टी होस्ट केली. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.करिना कपूरने आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत करिना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत ग्लॅमरस अवतारात दिसली. मलायका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, नताशा पूनावाला, करण जोहर, सारा अली खान, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, आलिया भट असे सगळे या पार्टीत हजर होते. मग काय, या सगळ्यांनी दणक्यात नाताळ साजरा केला.

करिना कपूर तिच्या गर्ग गँगसोबत दिसली.

मलायका, अमृता, करिना व आलिया  एका फ्रेममध्ये दिसल्या.

सांता क्लॅप घातलेल्या या सेलिब्रिटींनी धम्माल मस्ती केली. करण जोहरने अशी स्टाईलिश एन्ट्री घेतली.

रणबीर व आलिया एकमेकांसोबत मस्ती मूडमध्ये दिसले.

 

अर्पिता खानच्या ख्रिसमस  पार्टीत सेलिब्रिटी किड्सची धम्माल मस्ती पाहायला मिळाली.

तैमूर खान या पार्टीत दिसला.

करण जोहर या पार्टीत रूही व यश या आपल्या मुलांसोबत पार्टीत सामील झाला.

भाईजान सलमान शिवाय पार्टी अधुरी म्हणायची. तोही पोहोचला.

रितेश व जेनेलिया देशमुख हेही आपल्या मुलांसोबत पार्टीत दिसले.

 

टॅग्स :नाताळकरिना कपूरअर्पिता खान