Join us  

"काय होतीस तू,काय झालीस तू",करिना कपूरने शेअर केलेला फोटोमुळे होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 4:27 PM

करिना कपूचे व्हॅकेशदरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा एकटीचा फोटो पाहून चाहत्यांनाही चांगला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव एक्ट्रेस बेबो म्हणजेच करिना कपूर ओळखली जायची.फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्य असे जिचे वर्णन कधीकाळी बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानबद्दलही बोलले जायचे. तिची  प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करायची. मात्र आता काळानुसार करिनामध्येही बदल होत जात आहे. सुंदर दिसत असली तरी पूर्वी इतकी ती सुंदर दिसत नसल्याचे तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. करिना तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी व्हॅकेशवर गेली आहे. आपल्या कुटुंबासह तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ती करते. 

व्हॅकेशदरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा एकटीचा फोटो पाहून चाहत्यांनाही चांगला आश्चर्याचा धक्का बसला आहे. चेहऱ्या सुरकुत्या आणि निस्तेज त्वचा यामुळे हिला झालंय तरी काय अशा कमेंट्स तिच्या या फोटोंवर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावर प्रचंड थकवाही दिसत आहे. पूर्वी विनामेकअपमध्येही करिना फार सुंदर आणि तितकी ग्लॅमरस दिसायची.मात्र आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाच्या लूकमध्येही फार फरक पडल्याचे दिसते.

नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी करिना आता पूर्वीप्रमाणे जास्त सुंदर दिसत नाही.पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना आता एनर्जेटीक दिसत नाही.करिनाला ट्रोल करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही तर याआधीही तिला अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आले होते. 'तू आता म्हातारी झाली आहेस', 'आता तरी डाएट करणं बंद कर' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून करिना वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती. सीतामाताची भूमिका साकारण्यासाठी तिने भलमोठे मानधन मागितल्याचे बोलले गेले. १२ कोटी रु इतके मानधन तिने या भूमिकेसाठी मागितले होते. या भूमिकेत करिना झळकणार असल्याचे कळताच चाहत्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.

 

सीतामाताची भूमिका हिंदू अभिनेत्रीने साकारण्याची मागणी करण्यात येत होती. यानंतर दीपिका पदुकोणच्याही नावाची चर्चा होती. ना करिना ना दीपिका आता थेट कंगणा राणौतच या भूमिकेत झळकणार आहे. 

 

टॅग्स :करिना कपूर