Join us

करीना कपूरला ह्या व्यक्तीची वाटते जास्त चिंता, कोण आहे ही व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 18:24 IST

अभिनेत्री करीना कपूर आपल्या स्टाइलिश लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

ठळक मुद्देकरीनाला वाटते तैमूरची जास्त चिंता

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर नेहमीच आपल्या स्टाइलिश लूकमुळे चर्चेत असते. ती खासगी व प्रोफेशनल लाइफमध्ये योग्य ताळमेळ साधते. इतकेच नाही तर ती आपला मुलगा तैमूरकडे देखील लक्ष देते. ती त्याच्यासोबत खेळते, वॉकवर जाते व मस्ती करते. त्या दोघांचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

एका मुलाखतीत करीनाने तैमुरबद्दल सांगितले की, तैमूरला घरी ठेवून जेव्हा मी काम करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा मी तैमूरबद्दल विचार करते. तैमूरच्या बाबतीत मी खूप चिंतेत असते.

तिने पुढे सांगितले की, मला वाटते की, कामकाज करणाऱ्या आईंचा स्वतःवर विश्वास असतो, ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. जेव्हा मी सकाळी घरून निघते तेव्हापासून मला तैमूरची चिंता वाटत असते.

तैमूर आता घरी काय करत असेल. मला वाटते की जेव्हा मुल जसजसे मोठे होईल तसे ते आणखीन सन्मान आईला देईल. कारण तुम्ही कामावर जाता आणि मेहनत करून घरी येता व थकलेले असतानाही आनंदी असता. त्यावेळी आईदेखील खूश असते कारण जे तिला आवडते तेच ती करत असते, असे करीनाने सांगितले

टॅग्स :करिना कपूरतैमुर