Join us  

फक्त आॅक्टोबरपर्यंतची प्रतीक्षा! कपिल शर्मा पुन्हा एकदा करणार दमदार ‘वापसी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 7:11 PM

गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल सज्ज झाला आहे.

कपिल शर्माचे चाहते आपल्या या आवडत्या कलाकाराच्या कमबॅककडे डोळे लावून बसले आहेत. काही महिन्यांपूर्वी कपिल ‘फॅमिली विद कपिल शर्मा’ हा नवा कोरा शो घेऊन आला. पण हा शो प्रेक्षकांनी नाकारला आणि चार-दोन एपिसोडनंतरचं तो बंदही पडला. तेव्हापासून कपिल छोट्या पडद्यावरून गायब आहे. यादरम्यान त्याने अनेक  वाद ओढवून घेतले, तो डिप्रेशनमध्ये गेल्यानेही कानावर आले. पण तरिही त्याच्या डाय-हार्ट फॅन्सला कपिलच्या ‘वापसी’ची प्रतीक्षा आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरचं संपणार, अशी चिन्हे आहेत. होय, कपिलने एक पर्सनल ट्रेनर ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढलेय. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल सज्ज झाला आहे.  येत्या ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा टीव्हीवर दमदार वापसी करण्याची  कपिलची योजना आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्माला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची गाडी रूळांवर आणायची आहे. त्यामुळे त्याने आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत. आधीसारखा फिट होण्यासाठी तो प्रयत्न करतोय. यासाठी त्याने एक पर्सनल ट्रेनर हायर केला आहे.एकंदर काय तर दीर्घकाळानंतर कपिलबद्दल एक चांगली बातमी कानावर आली आहे. कपिल लवकरच बरा होईल आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, यात काहीही शंका नाही. गतवर्ष कपिलच्या करिअरच्या दृष्टीने फारसे चांगले राहिले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच कपिलच आणि सुनील ग्रोवरचे भांडण झाले. याचा फटका शोला बसला यानंतर वारंवार कपिलची तब्येत बिघडायला लागली. त्यामुळे शोदेखील ऑफ एअर करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊऩ शूटिंग न करताच परतावे लागले.  गतवर्षी आलेला कपिलचा ‘फिरंगी’ चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

 

टॅग्स :कपिल शर्मा