Join us  

​मणिकर्णिका चित्रपटाला घेऊन सुरू असलेला विवादावर अखेर बोलली कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 4:10 AM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने आतापर्यंत केलेल्या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले आहे आणि आता लवकरच तिचा माणिकर्णिका चित्रपटातून ...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने आतापर्यंत केलेल्या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले आहे आणि आता लवकरच तिचा माणिकर्णिका चित्रपटातून आपल्या भेटीला येणार  आहे. ह्या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण सध्या ह्या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाला घेऊन काही जणांचे म्हणणे आहे की यात  राणी लक्ष्मीबाईंचे पात्र योग्यरित्या दाखवले गेले नाहीयं.कंगनाने मात्र या सर्व गोष्टीचे खंडन केले आहे. तिने म्हटले की, काही लोकांना चुकीचे विधान करून वाद घालायची आणि लोकप्रियता मिळवायची हेच ह्या मागचे कारण आहे. कंगना पुढे म्हणाली, "माणिकर्णिका हा चित्रपट कोणत्याही वादाशी जुळलेला नाही, किती वाईट गोष्ट आहे की आपण एक अश्या स्त्रीवर वाद घालत आहोत जी एकेकाळी ब्रिटिशांशी एकटी लढली होती"माणिकर्णिकामध्ये झांशीच्या राणीची भूमिका साकारणारी कंगना बिकानेरला जात असताना. जोधपूर विमानतळावर कंगना पहिल्यांदाच आपल्या भूमिकेबद्दल बोलली ती म्हणाली " राणी लक्ष्मीबाई भारताची कन्या होती ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोलाचे योगदान दिले. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना नक्कीच अभिमान वाटेल. या चित्रपटात कुठलाही प्रेम प्रसंग नाही हा चित्रपट बाहुबलीचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिला आहे, ते ह्या चित्रपटातील राणीच्या पात्रावरून इतके प्रभावित झाले आहे की त्यांनी आपल्या मुलीचे नाव माणिकर्णिका ठेवले आहे."ALSO READ :  ​कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’साठी करावी लागणार ‘आॅगस्ट’ची प्रतीक्षा!'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.  अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत.