Join us

​‘रंगून’नंतर कंगना करणार ऐतिहासिक चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 18:02 IST

बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनविण्यात येणाºया चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अखेर केतन मेहता एका इंटरनॅशनल प्रॉडक्शन ...

बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनविण्यात येणाºया चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अखेर केतन मेहता एका इंटरनॅशनल प्रॉडक्शन कंपनीच्या सहकार्याने हा चित्रपट साकारणार आहेत आणि यातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका कंगना रानोट हिला मिळाली आहे.  ‘रंग रसिया’ आणि ‘मांझी: दी माऊंटेनमॅन’ यासारख्या बायोपिकचा अनुभव केतन मेहतांकडे आहे. केतन यांच्या मते, कंगना एक जिगरबाज अभिनेत्री आहे आणि म्हणूनच या चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना स्वत:ही या भूमिकेसाठी अतिशय उत्सूक आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्यानंतर पुढील वर्षी मध्यापर्यंत कुठलाही दुसरा चित्रपट साईन करणार नाही, असे वचन तिने मेकर्सला दिले आहे. कंगना सध्या विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’मध्ये बिझी आहे. साहजिक राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचा चित्रपट मार्गी लागला तर ‘रंगून’नंतर कंगना थेट याच चित्रपटात दिसणार..