Join us  

​कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’साठी करावी लागणार ‘आॅगस्ट’ची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 10:18 AM

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट ...

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही. आधी हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये येणार, अशी खबर होती. पण ताजी खबर मानाल तर, या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या व्हीएफएक्सचे काम शिल्लक आहे. त्यामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहे. पण अन्य एका सूत्रांनेमात्र रिलीज डेट लांबण्यामागे वेगळेच कारण सांगितले आहे. होय, सगळे काही ट्रॅकवर आहे. पण मेकर्सला या चित्रपटाच्या रिलीजसाठी स्वातंत्र्यदिनाचे मुहूर्त हवे होते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातच हा चित्रपट रिलीज व्हावा, अशी मेकर्सची इच्छा होती. इंग्रज आणि झांसीची राणी यांच्यातील लढाईवर आधारित असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर  आल्यास लोकांच्या भावना ‘कॅश’ करता येतील, हा यामागचा मेकर्सचा उद्देश असल्याचे कळतेय.‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ या चित्रपटात कंगना राणौत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच कंगणा व संपूर्ण टीम चित्रपटाच्या उर्वरित शूटींगसाठी राजस्थानच्या बिकानेरकडे रवाना होणार आहे.अर्थात बिकानेरमध्ये  शूटींग सुरू होण्याआधीच या चित्रपटावर संकटाचे ढग जमू पाहत आहेत.  राजस्थानच्या सर्व ब्राह्मण महासभा या सामाजिक संघटनेने या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ मध्ये राणी लक्ष्मीबाईचे प्रेमसंबंध दाखवण्यात आल्याचा दावा या संघटनेने केला असून याला विरोध म्हणून राजस्थानात या चित्रपटाचे शूटींग हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे. सर्व ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. ह्य‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ मध्ये ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यातून केला आहे. या चित्रपटात महाराणी लक्ष्मीबाईचे एका इंग्रज अधिकाºयासोबतचे प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मणिकर्णिका : द क्विन आॅफ झांसी’ चे शूटींग त्वरित रोखण्यात यावे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा या संघटनेने दिला आहे. ALSO READ : कंगना राणौतला भासू लागली जोडीदाराची उणीव! पुढीवर्षी फेब्रुवारीत वाजणार सनई चौघडे!!