Join us  

कंगना राणौत म्हणते बॉयफ्रेंडमध्ये हा गुण हवाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 9:56 AM

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना राणौत आपल्या लव्ह लाईफबाबत नेहमीच मोकळेपणाने बोलते. नुकतेच कंगना एका चॅट शोवर ...

कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना राणौत आपल्या लव्ह लाईफबाबत नेहमीच मोकळेपणाने बोलते. नुकतेच कंगना एका चॅट शोवर आली होती. कंगना यावेळी सांगितले की ती एक देशभक्त आहे आणि तिचा बॉयफ्रेंड मध्ये सुद्धा तिला हा गुण हवा आहे.  या चॅट शो दरम्यान बोलताना कंगना म्हणाली, माझे देशावर खूप प्रेम आहे. जर माझा बॉयफ्रेंड देशभक्त नसेल तर मी ब्रेकअप करेन. जर तो आपल्या देशा प्रति समर्पित होऊ शकत नाही तर मला असे वाटते तो माझ्याबाबत देखील कधी समर्पित होऊ शकत नाही.  याआधी कंगना आदित्य पंचोली, अध्ययन सुमन आणि ह्रतिक रोशनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. ती नेहमीच आपल्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत असते.सध्या कंगना मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे.  काही दिवसांपूर्वी कंगनाचे सेटवरचे फोटो लीक झाले होते. ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.  अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. कंगनाचे याआधी आलेले दोन्ही चित्रपट फ्लॉप गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून कंगनाला बऱ्याच अपेक्षा आहेत. ती सध्या एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तलवार बाजी करताना कंगनाच्या नाकाला ही दुखापत झाली होती. ALSO READ :  ​श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्याने कंगना राणौतला भरला ताप! थांबवावे लागले ‘मणिकर्णिका’चे शूटींग!!