Join us

कंगना राणौतला मिळाले सरप्राइज गिफ्ट; स्टाफसोबत केले बर्थडे सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 18:47 IST

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने २३ मार्च रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी कंगनाच्या स्टाफने तिला सरप्राइज केक देताना ...

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने २३ मार्च रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी कंगनाच्या स्टाफने तिला सरप्राइज केक देताना तिचा वाढदिवस आणखी स्पेशल बनविण्याचा प्रयत्न केला. कंगनाने तिचा वाढदिवस मनाली येथील बंगल्यात साजरा केला. यावेळी कंगनाने स्वत: आपल्या घराच्या परिसरात ३१ रोपांची लागवड केली. कंगनाच्या वाढदिवसाचे फोटोज् तिच्या फॅन क्लबकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. कंगनाने तिचा हा खास दिवस फॅमिली आणि मित्रांसोबत सेलिब्रेट करणे पसंत केले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कंगना सध्या आपल्या नव्या घरी टाइम स्पेंड करीत आहे. कंगनाच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या स्टाफसोबत केक कापताना बघावयास मिळत आहे. कंगनाला सरप्राइजमध्ये देण्यात आलेला केक तिच्या नव्या बंगल्यात कापण्यात आला. कंगना काही दिवसांपूर्वीच तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिची बहीण रंगोलीने ट्विटर पेजवर कंगनाचे काही कॅँडिड फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये कंगना वृक्षारोपण करताना बघावयास मिळत होती. रंगोलीने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, वाढदिवसानिमित्त आपल्या क्वीनने एक हिरवळ प्लानेट तयार केला आहे. ईश्वराकडे मी हीच प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. एका मुख्य वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पियानो खरेदी केला. या वृत्तापत्रानुसार, कंगनाने म्हटले की, ‘पियानो शिकणे हे सुरुवातीपासूनच माझ्या यादीत होते. यासाठी माझ्याकडे आता सर्वांत जास्त वेळ आहे. मला क्लासिकल म्युझिक खूप आवडते. अशाप्रकारच्या कॉन्सर्टमध्ये मी नेहमीच जात असते. यामुळेच मी माझ्यासाठी एक पियानो खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. पियानो शिकणे खूप अवघड आहे. आतापर्यंत माझे शिक्षकच पियानो वाजवित आहेत अन् मी ते ऐकत आहे. वयाच्या १७व्या वर्षी घर सोडल्यानंतर मुंबईमध्ये आलेल्या कंगनाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी खूप मेहनत घेतली. कंगनाला महेश भट्ट यांच्या ‘गॅँगस्टर’ या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला होता. मात्र हा चित्रपट तिला सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.