Join us

कंगना राणौतच्या आप की अदालतमधील मुलाखतीनंतर नेटिझन कंगनाला का मागायला सांगत आहेत क्रिश ३ साठी माफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 12:21 IST

कंगना राणौतने आप की अदालत या कार्यक्रमात दिलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. कंगना ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ...

कंगना राणौतने आप की अदालत या कार्यक्रमात दिलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. कंगना ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तिनेच मीडियामध्ये तिच्या आणि हृतिकच्या अफेअरविषयी सांगितले होते. एवढेच नव्हे तर नेपोटिझमवर तिने करण जोहरला सडेतोड उत्तर दिले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या या वक्तव्यांमुळे ती प्रकाशझोतात आली आहे.आप की अदालत या कार्यक्रमात तिने दिलेल्या मुलाखतीत तिने हृतिक रोशनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हृतिक आणि तिच्या अफेअरविषयी तिने अनेक खुलासे केले आहेत. तसेच तिचा पूर्वप्रियकर आदित्य पांचोलीला देखील तिने खडे बोल सुनावले आहेत. एवढेच नव्हे तर तिने हृतिकसोबत राकेश रोशन यांना देखील चांगलेच ऐकवले आहे. या सगळ्यामुळे तिच्या या मुलाखतीची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सोशल मीडियावरील मंडळींना हृतिक आणि कंगनाच्या नात्याबद्दल काहीच पडलेले नाही. त्यांनी कंगनाची मुलाखत तितकीशी गंभीरच घेतली नसल्याचे काहींच्या ट्वीटवरून दिसून येत आहे. त्यांनी कंगना आणि हतिकची टिंगल उडवणारे ट्वीट करायला सुरुवात केले आहे. अक्षय जैन म्हणून एका नेटिझनने हृतिकचा एक फोटो पोस्ट करून कंगनाच्या मुलाखतीनंतर हृतिकची प्रतिक्रिया अशी असणार असे म्हटले आहे. तर बोले चुडिया, बोले कंगना हा फोटो गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत आहे.तर पकचिपाक राजा बाबू या नेटिझननने राकेश रोशन सध्या शहराच्या बाहेर असल्याने हृतिकला ते डायरेक्ट करू शकत नाहीत त्यामुळे हृतिकने काहीही प्रतिक्रिया दिली नाही असे म्हणत हृतिकची टर उडवली आहे. त्यासोबतच त्याने बाजीगर चित्रपटातील जॉनी लिव्हरवर चित्रीत करण्यात आलेले प्रसिद्ध चहाचे दृश्य पोस्ट करून कंगणाची मुलाखत पाहाताना राकेश रोशन आणि हृतिक रोशनची अशी अवस्था झाली असेल असे म्हटले आहे    आणि सगळ्यात हास्यस्पद म्हणजे इनजिनिअस या नेटिझनने तर हृतिक आणि कंगनाने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून क्रिश ३ साठी सगळ्यांची माफी मागितली पाहिजे असे म्हणत त्या दोघांचीही फिरकी घेतली आहे.    Also Read : अखेर आदित्य पांचोली बोललाच!! म्हणे, कंगना राणौत झाली वेडी!