Join us  

शाहरुख खानच्या चेहऱ्याला शाई फासण्याची धमकी अखेर रद्द, कलिंग सेना नरमली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:13 AM

शाहरुख खानवरचे संकट टळलेय, असे म्हणायला हरकत नाही. होय, भुवनेश्वरच्या कलिंग सेना या स्थानिक संघटनेने शाहरुखने ओडिशात पाऊल ठेवण्यास त्याच्या चेहºयाला शाई फासण्याची धमकी दिली होती. पण आता कलिंग सेनेने आपली ही धमकी मागे घेतली आहे.

ठळक मुद्देओडिशात शाहरुखने पाय ठेवल्यास त्याच्या चेह-यावर शाही फेकण्याची धमकी कलिंग सेनेने दिली होती. पण आता कलिंग सेनेचे प्रमुख हेमंत रथ यांनी ही धमकी रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

शाहरुख खानवरचे संकट टळलेय, असे म्हणायला हरकत नाही. होय, भुवनेश्वरच्या कलिंग सेना या स्थानिक संघटनेने शाहरुखने ओडिशात पाऊल ठेवण्यास त्याच्या चेह-याला शाई फासण्याची धमकी दिली होती. पण आता कलिंग सेनेने आपली ही धमकी मागे घेतली आहे.ओडिशात आजपासून सुरू होणा-या मेन्स हॉकी वर्ल्ड कपच्या उद्घाटन समारंभात शाहरूख सहभागी होण्यास या संघटनेने विरोध केला होता. ओडिशात शाहरुखने पाय ठेवल्यास त्याच्या चेह-यावर शाही फेकण्याची धमकी कलिंग सेनेने दिली होती. पण आता कलिंग सेनेचे प्रमुख हेमंत रथ यांनी ही धमकी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. आम्ही हॉकी इंडिया प्रेसिडेंट, ओडिशा सरकार आणि पोलिसांच्या आवाहनानंतर आमची धमकी मागे घेतली आहे. यानंतरचा निर्णय नंतर घेण्यात येईल. अर्थात याचा अर्थ आम्ही शाहरुखला माफ केले असा नाही. आमच्या राज्यात मेन्स हॉकी वर्ल्ड कप होणे आमच्यासाठी आणि भारतासाठी गौरवाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले.दरम्यान कलिंग सेनेने धमकी मागे घेण्याआधीच शाहरूख मेन्स हॉकी वर्ल्ड कपच्या उद्घाटनाला हजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार आजच्या सोहळ्याला शाहरूख हजर राहणार आहे.काय आहे प्रकरणओडिशात शाहरूखला विरोध होण्यामागे त्याचा १७ वर्षांपूर्वी रद्द झालेला एक चित्रपट कारणीभूत होता. होय, १७ वर्षांपूर्वी शाहरुखचा ‘अशोका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा व कलिंगची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. हा ओडिशातील जनतेचा अपमान असल्याचे कलिंग संघटनेचे म्हणणे आहे. ओडिशातील लोकांच्या भावना दुखावण्याबद्दल शाहरूखने माफी मागावी, अशी कलिंग संघटनेची मागणी आहे. २००१ मध्ये ‘अशोका’ रिलीज झाल्यानंतर या वादाची सुरूवात झाली होती. रिलीजच्या एक आठवड्यानंतर ‘अशोका’ ओडिशातून हटवावा लागला होता.

टॅग्स :शाहरुख खान