‘कबाली’चा हिंदी प्रमो आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 22:07 IST
येत्या२२ जुलै रोजी ‘कबाली’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी निर्मात्यांनी ‘कबाली’चा हिंदी प्रोमो लाँच केला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगु या भाषांमध्ये जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये रजनीकांतचा ‘कबाली’ रिलीज होत आहे.
‘कबाली’चा हिंदी प्रमो आला...
सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कबाली’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. (तत्पूर्वीच तो लीक झाल्याची बातमीही आलीय.)२२ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी आज निर्मात्यांनी ‘कबाली’चा हिंदी प्रोमो लाँच केला आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगु या भाषांमध्ये जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये रजनीकांतचा ‘कबाली’ रिलीज होत आहे. ‘कबाली’ची प्रेक्षकांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. साहजिकच या चित्रपटाचा हिंदी प्रोमो लाँच होताच प्रेक्षकांनीही लगोचच त्याला उचलून धरले आहे. एस. थानू निर्मित आणि पीए.रंजीथ दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत एका मलेशियन डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसह राधिका आपटे, किशोर, कलैरसन, धन्सिका, विन्सटन चाओ, दिनेश हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत.