Join us

जॉन अब्राहमचा ‘हा’ फोटो होत आहे व्हायरल; पण का? जाणून घ्या त्यामागील कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:31 IST

फोटोमध्ये जो चिमुकला दिसत आहे, तो जॉन अब्राहमशी त्याचे अतिशय जवळचे नाते आहे. जाणून घेण्यासाठी क्लिक करा !

अभिनेता जॉन अब्राहम लवकर आगामी ‘परमाणु’ या चित्रपटातून दमदार भूमिकेतून बघावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या रिलीजला अजून बराच अवधी आहे, परंतु त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक चिमुकला जॉनसोबत बघावयास मिळत आहे. हा मुलगा दुसरा-तिसरा कोणीही नसून, जॉनचा पुतण्या आहे. जॉनने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोला आतापर्यंत २ लाख ५४ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. हा फोटो शेअर करताना जॉनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याचे बायसेप्स माझ्या डोक्यापेक्षाही अधिक मोठे आहे काय?’ फोटोमध्ये हा चिमुकला कमालीचा आश्चर्यचकित होऊन त्याच्या काकाकडे बघत आहे. हा चिमुकला खूपच गोंडस असून, त्याच्या या भावमुद्रा बघण्यासारख्या आहेत. तुम्ही पहा तुमच्याही लक्षात येईल. असो जॉनचा आगामी ‘परमाणु’ हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे आतापर्यंत दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत.  चित्रपट १९९८ मध्ये पोखरण येथे केलेल्या अणू चाचणीवर आधारित आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टविषयी सांगायचे झाल्यास जॉन अब्राहम, डायना पेंटी आणि बोमन इराणी चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. चित्रपटाचे संपूर्ण नाव ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’ असे आहे. राजस्थान येथे घेण्यात आलेल्या यशस्वी अणुचाचणीनंतर भारत युनायटेड स्टेट, सोव्हियत गणराज्य, ब्रिटन, फ्रान्स आणि चीननंतर न्यूक्लिअर बॉम्बची यशस्वी चाचणी घेणारा जगातील सहावा देश ठरला होता. जेए एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाची कोणाशी टक्कर होणार याविषयी सुरुवातीपासूनच चर्चा रंगल्या होत्या. आता आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटाला क्लॅश होण्याची शक्यता आहे. कारण हा चित्रपट देखील ८ डिसेंबर रोजीच रिलीज होणार आहे.