Join us  

भाईजानच्या ‘दस का दम’मध्ये का गेला नाही जॉन अब्राहम?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 8:30 PM

जॉन अब्राहम सध्या आपल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो प्रमोशन करताना दिसतोय.

जॉन अब्राहम सध्या आपल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो प्रमोशन करताना दिसतोय. टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या बहुतांश सगळ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जॉन प्रमोशनसाठी पोहोचला. पण एका रिअ‍ॅलिटी शोवर जाणे मात्र त्याने जाणीवपूर्वक टाळले. हा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे, ‘दस का दम’. भाईजान सलमान खान सध्या या शोचे सूत्रसंचालन करतोय. पण जॉनने ‘दस का दम’ऐवजी ‘इंडियन आयडॉल’ या शोला पसंती दिली. 

लवकरच जॉन या शोच्या सेटवर ‘सत्यमेव जयते’चे प्रमोशन करताना दिसणार आहे.  ‘इंडियन आयडॉल’मध्ये गायिका नेहा कक्कर परिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘सत्यमेव जयते’मधील ‘दिलबर’ हे गाणे नेहाने गायले आहे. केवळ नेहामुळे जॉन ‘इंडियन आयडॉल’मध्ये गेला, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. प्रत्यक्षात याला सलमान आणि जॉनचा भूतकाळ कारणीभूत आहे. जॉन आणि सलमान यांच्यात शत्रूत्व नाही, तशीच मैत्रीही नाही. दोघांनीही ती करण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, असेचं काही जॉन व सलमानबद्दल म्हणता येईल. आता जॉनने भाईजानच्या शोवर जाणे का टाळले, हे तुम्हाला कळले असेलच.

येत्या १५ ऑगस्टला जॉन चा 'सत्यमेव जयते' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ह्याव्यतिरिक्त जॉनकडे अजून दोन सिनेमा आहेत ते म्हणजे  "बाटला हाऊस आणि रॉ : रोमिओ अकबर वॉल्टर. हे सगळे सिनेमा अॅक्शनने भरलेले आहेत. रॉमध्ये तर जॉन आहे गुप्तहेर साकारत आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे.

 

 

 

टॅग्स :जॉन अब्राहम