Join us  

jiah khan suicide case : सूरज पांचोलीाविरोधात आरोप निश्चित! आदित्य पांचोली म्हणतो, खटला सुरु झाल्याचा आनंद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 4:47 AM

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे अभिनेता सूरज पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सूरज पांचोलीवर आत्महत्येस ...

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे अभिनेता सूरज पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सूरज पांचोलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप निश्चित केला आहे. येत्या १४ फेबु्रवारीपासून याप्रकरणी साक्षीदारांची तपासणी सुरु होणार आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर सूरजने मीडियासमोर येणे टाळले. पण त्याचे वडिल आणि अभिनेते आदित्य पांचोली यांनी मात्र मीडियासमोर येत आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला. कोर्टाने माझ्या मुलाविरोधात आरोप निश्चित केले आहेत. पण मुलाविरोधात खटला सुरु होणार, याची मला अजिबात भीती नाही. उलट मी तर खटला सुरु होण्याची प्रतीक्षा करत होतो. कारण कोर्टात सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. माझा मुलगा खरचं दोषी असेल तर त्याला शिक्षा मिळेल, नाहीतर तो निर्दोष सुटेल, असे आदित्य पांचोली म्हणाला. वाईट प्रसंगात माझ्या कुटुंबाला इंडस्ट्रीतील कुणीही आधार दिला नाही. पण सलमान कायम माझ्या पाठीशी उभा राहिला, असेही आदित्यने सांगितले.जिया खानबद्दलही आदित्य बोलला. एकदा मी जियाला भेटलो होतो. ती खूप चांगली व्यक्ती होती. पण मला तिची संपूर्ण पार्श्वभूमी माहित नाही. तिने स्वत:ला का मारले, मला ठाऊक नाही. माझ्या माहितीप्रमाणे ती उच्चशिक्षीत होती. पण लहानपणीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जिया प्रकरणात बाप म्हणून सूरजची काळजी वाटणे साहजिक आहे. त्याच्या अवतीभवती कसे लोक आहेत, याची आम्हाला सतत चिंता वाटत असते, असेही तो म्हणाला.ALSO READ : जिया खानची आई राबिया खान यांनी पुन्हा लिहिले पंतप्रधानांना पत्र; न्यायाची केली याचना! जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या राहत्या घरी फासावर लटकलेली आढळली होती. सूरज व जिया कथितरित्या रिलेशनशिपमध्ये होते. मृत्यूच्या दोन दिवस आधी ती सूरजच्याच सोबत होती आणि ३ जूनजा सकाळी घरी परतली होती. जियाच्या मृत्यूनंतर तिचा कथित प्रियकर सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली होती. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सूरजवर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते.