Join us

जीम आउटफिटमध्ये अशा अंदाजात दिसली जान्हवी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:09 IST

जान्हवी कपूर तिच्या ‘धडक’ या चित्रपटाच्या रिलीजअगोदरच चर्चेत आहे. दररोज जान्हवीबद्दल कुठली ना कुठली बातमी समोर येत असते. काही ...

जान्हवी कपूर तिच्या ‘धडक’ या चित्रपटाच्या रिलीजअगोदरच चर्चेत आहे. दररोज जान्हवीबद्दल कुठली ना कुठली बातमी समोर येत असते. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिच्या ‘धडक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. एक दिवसांपूर्वीच जान्हवी पापा बोनी कपूर आणि सावत्र बहीण अंशुला कपूरसोबत डिनरला जाताना बघावयास मिळाली होती. आता पुन्हा एकदा जान्हवीचे काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई बांद्रा येथे बघावयास मिळालेल्या जान्हवीचा स्टनिंग अंदाज समोर आला. यावेळी जान्हवी तिच्या मैत्रिणबरोबर बघावयास मिळाली. जान्हवी आणि तिची मैत्रिण बांद्रा येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहेत. दोघेही जीमच्या आउटफिटमधून दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीही जान्हवीला अशा अंदाजात बघण्यात आले आहे. खरं तर जेव्हा तिच्या ‘धडक’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली नव्हती तेव्हापासूनच ती डान्स क्लास आणि जीममध्ये जाताना स्पॉट व्हायची. शूटिंगचे शेड्यूल असतानाही जान्हवीने जीम आणि डान्स क्लास जाणे बंद केले नाही. दरम्यान, ‘धडक’ या चित्रपटात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर जान्हवीच्या अपोझिट झळकणार आहे. दोघांचा हा चित्रपट ‘सैराट’ या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. असे म्हटले जात आहे की, ईशानसोबत जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवेल. सध्या जान्हवी बहीण सोनम कपूरच्या लग्नावरून चर्चेत आहे. सध्या ती लग्नाच्या तयारीत असून, संगीत सेरेमनीत मॉम श्रीदेवीच्या गाण्यांवर ती परफॉर्मन्सही करणार आहे. सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत येत्या ८ मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.