Join us  

पहिल्याच शोनंतर 'जवान' ऑनलाइन लीक, मेकर्सला मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:29 PM

याआधी 'पठाण'ही ऑनलाइन लीक झाला होता पण...

किंग खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'जवान' (Jawan)आज रिलीज झाला. चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बघत थिएटरबाहेर जल्लोष केला. शाहरुखची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 'जवान' ची क्रेझ दुबईच्या बुर्ज खलिफापर्यंत पोहोचली. मात्र आता जवानच्या मेकर्सला काळजीत टाकणारी बातमी आहे. जवान ऑनलाईन लीक झाला असून अनेकांनी डाऊनलोडही केला आहे. यामुळे मेकर्सला फटका बसू शकतो. २०२३ च्या सुरुवातीलाच शाहरुखने 'पठाण' सिनेमातून आपली जादू दाखवली. 'पठाण' अनेक रेकॉर्ड करत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला.आपल्याच सिनेमाचा रेकॉर्ड मोडायला शाहरुख सज्ज झाला आहे. 'पठाण'च्या कमाईपेक्षा 'जवान'जास्त कमाई करेल असा अंदाज आहे. मात्र आता शाहरुखला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण 'जवान'चा पहिला शो होताच सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. अनेक युझर्सने तो डाऊनलोडही केला. पायरसीचा थेट परिणाम 'जवान'च्या कमाईवरही होण्याची शक्यता आहे. 

'जवान' अनेक साईट्सवर लीक झाला आहे. याआधीही 'पठाण'ही लीक झाला होता. पण तरी पठाणने चांगली कमाई केली होती. आता जवानबाबतीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग तर जोरदार झालं. १ सप्टेंबर पासूनच अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. शाहरुखची क्रेझ स्पष्ट दिसून येत आहे. पायरसीनंतरही जवान ओपनिंग डे लाच रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल अशी शक्यता आहे. 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खान