Join us

​जॅकलिनला लागलाय ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 19:49 IST

श्रीलंकन ब्युटी क्विन व बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिझला ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव यावे याचा ध्यास लागला ...

श्रीलंकन ब्युटी क्विन व बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिझला ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव यावे याचा ध्यास लागला आहे. मुंबई येथील बीकेसी गार्डनमधील एका कार्यक्रमात ६० सेंकदापर्यंत ‘प्लँक पोझिशन’मध्ये राहून वर्ल्ड रेकॉर्ड कायम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जॅकलिनचा उल्लेख बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रीमध्ये केला जातो. तिच्या फिटनेसचे रहस्य दडवून न ठेवता ती सर्वांना फिटनेसप्रती अवेअर करणार आहे. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येणाºया ऊङ्म ङ्म४ कॅम्पेनमध्ये सहभागी होणार असून, सुदृढ आयुष्यासाठी चांगला आहार असा संदेश देणार आहे. यावेळी ती ६० सेंकदापर्यंत प्लँक पोझिशनमध्ये राहणार आहे. यामाध्यमातून तिने लोकांना आरोग्याप्रती जागरुक करण्याचा प्रयत्न करणार आहे.  जॅकलिनने मुंबई मिररला दिलेला इंटरव्ह्यू सध्या चांगलाच व्हायरल होत असून ती म्हणाली, ‘या अभियानाच्या माध्यमातून मुलीचा आत्मविश्वास वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. मुलींनी स्वत:चा तसाच स्वीकार करायला हवा जशा त्या आहेत’. पुढील वर्षी आयोजित केल्या जाणाºया मुंबई मॅरेथानसाठी देखील जॅकलिन चांगलीच तयारी करीत आहे. जॅकलिन मुलींच्या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जॅकलिन म्हणाली, आजचे युवा आपल्या विचारांना बदलू पाहत आहेत, केवळ डायटिंगच्या बळावर ते आपल्या शरीराला अधिक आकर्षक करू इच्छितात. त्यांना एक्झरसाईजचा तिटकारा वाटतो. वजन कमी करण्यासाठी ते आपल्या शरीराला शिक्षा देतात, त्यांना हेच माहित नाही की, आपण आपल्या शरीराला तेव्हाच चांगला आकार देऊ शकतो. जेव्हा ते आनंदी व समाधानी असेल. तोपर्यंत शरीराला फिट ठेवणे कठीण आहे. फॅशनचा अंदाज वेळेनुसार बदलत आहे. यासाठी आपल्याला जे करायचे आहे ते करायलाच हवे. जसे कपडे घालावयाचे आहे तसे कपडे घालायलाच पाहिजे. आपल्याला काय करायचे आहे हे आपणच ठरावयाला हवे असेही ती म्हणाली.