Join us  

'या' कारणामुळे जॅकलिन फर्नांडिस पोहोचली नंबर 1वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 1:01 PM

'रेस 3'च्या यशानंतर जॅकलिन फर्नांडिस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलिन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय

ठळक मुद्देमॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली.

रेस 3 च्या यशानंतर जॅकलिन फर्नांडिस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलिन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीच्यानुसार, इंस्टाग्रामवर सध्या रेस-3 चित्रपटाची ही जोडी नंबर वन आहे.  

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. रेस-3च्या प्रमोशनमध्ये सगळीकडे दिसलेली जॅकलीन दबंग टूर दरम्यानही आपल्या इन्स्टा स्टोरीजव्दारे आपल्या फॉलोवर्सचे लक्ष वेधून घेत होती. तर दबंग खान गेल्या काही दिवसांमध्ये रेस-3, ईद सेलिब्रेशन, दस का दम आणि दबंग टूरच्यामूळे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. 

ALSO READ : जॅकलिन फर्नांडिसच्या डोळ्याला ‘परमनेंट इंज्युरी’!

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “जॅकलिन आपल्या इन्स्टा-पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीजसाठी खूप लोकप्रिय आहे. रेस-3च्या प्रमोशनच्यावेळी आणि दबंग टूरच्या दरम्यान जॅकलिनने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीजच्यामुळे इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता सर्वाधिक दिसून आलीय. सलमान खानच्या प्रत्येक इन्स्टा फिडला मिळालेल्या लाखों लाइक्स आणि प्रत्येक पोस्टवर येणा-या हजारों कमेंट्सवरून सलमान खानची पॉप्यूलॅरिटी दिसूनच येते. म्हणूनच हे दोघेही इन्स्टाग्रामवर नंबर वन ठरलेत.“

मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि  हा चित्रपट तिला मिळाला.जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत. हॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे जॅकचे स्वप्न होते. पण कदाचित जॅकच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. हॉलिवूडऐवजी ती बॉलिवूडची अभिनेत्री झाली. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस