Join us  

जॅकलिन फर्नांडिसच्या डोळ्याला ‘परमनेंट इंज्युरी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 11:45 AM

काही दिवसांपूर्वी जॅकलिन फर्नांडिसच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत खरोखरीचं गंभीर होती. होय, या दुखापतीत जॅकच्या एका ...

काही दिवसांपूर्वी जॅकलिन फर्नांडिसच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत खरोखरीचं गंभीर होती. होय, या दुखापतीत जॅकच्या एका डोळ्याच्या बुब्बुळांना कधीही दुरूस्त न होणारी इजा झाली आहे. जॅकने स्वत: ही माहिती दिली आहे. ‘डोळ्याला परमनेंट इंज्युरी झालीय. आता माझे बुब्बुळ कधीच परफेक्ट गोल आकारात येणार नाही. नशिबाने मी बघू शकते,’असे जॅकने सोशल मीडियावर म्हटले आहे.सोबत दुखापत झालेल्या डोळ्याचा फोटोही शेअर केला आहे. ‘रेस3’च्या शूटींगदरम्यानच्या फावल्या वेळात जॅक स्क्वॅश खेळत असताना जॅकच्या डोळ्याला दुखापत झाली होती. यावेळी बॉल थेट तिच्या डोळ्यावर येऊन आदळला होता. तो इतक्या जोरात आदळला होता की, जॅकच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले होते. यानंतर लगेच तिला रूग्णालयात हलवण्यात आले होते. जॅकलिनला स्क्वॅश हा खेळ अतिशय आवडतो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरचे फोटो पाहिले असता तिचे  स्क्वॅश  प्रेम दिसून येते. हाच गेम खेळताना आपण गंभीर जखमी होऊ  असे जॅकला स्वप्नातही वाटले नसेल. काहींच्या मते, ‘रेस3’साठी एक सीन शूट करताना तिला ही दुखापत झाली होती. दुखापत कशीही होवो, पण यात जॅकचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, हेच खरे. ‘रेस3’ या चित्रपटात जॅक सलमान खानसोबत दिसणार आहे.  या चित्रपटात सलमान व जॅकलिनशिवाय बॉबी देओल, साकिब सलीम, डेजी शाह मुख्य भूमिकेत आहेत.  ‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजे येत्या १५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ALSO READ :'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उतावळी झालीय जॅकलिन फर्नांडिस