Join us  

यूलिया वंतूरचा डेब्यू सिनेमा अखेर लागला मार्गी! आता या नावाने होणार रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 4:00 PM

सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वंतूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ या चित्रपटातून यूलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण दुसऱ्याच महिन्यात म्हणजे, डिसेंबरमध्ये यूलियाचा हा चित्रपट रखडला.

ठळक मुद्देया चित्रपटात यूलिया कृष्णभक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वंतूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ या चित्रपटातून यूलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण दुसऱ्याच महिन्यात म्हणजे, डिसेंबरमध्ये यूलियाचा हा चित्रपट रखडला. चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरा हिला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक झाली आणि ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ थंडबस्त्यात पडला. पहिलाच चित्रपट असा दृष्टचक्रात अडकलेला पाहून यूलिया कमालीची निराश झाली. पण आता ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ पुन्हा एकदा ट्रॅकवर आल्याची खबर आहे.

होय, तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले या चित्रपटाचे शूटींग लवकरच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे, आता हा चित्रपट ‘मोह मोह के धागे’ या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रेम सोनी, कशिश खान आणि ओम प्रकाश भट हे हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. आता हा चित्रपट ‘मोह मोह के धागे’ या नावाने प्रदर्शित होईल. पुढील महिन्यात युरोपमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल. प्रेम सोनी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. मी माझ्या अन्य काही मित्रांसोबत हा चित्रपट प्रोड्यूस करतोय. आम्ही या चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यामुळे यानंतरचे सगळे काम आमच्या मतानुसार होईल. या चित्रपटाचे एक छोटेसे शेड्यूल युरोपमध्ये पूर्ण केले जाईल. यानंतर मथुरेत चित्रपटाचे दुसरे शेड्यूल शूट होईल. लवकरच यातील यूलियाचा नवा लूक प्रदर्शित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.या चित्रपटात यूलिया कृष्णभक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खान