it's shocking : सारा अली खानच्या डेब्यूवर काय म्हणाली करिना कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 18:54 IST
सगळे बॉलिवूड 18व्या आयफा पुरस्कारासाठी न्यूयॉर्कला गेले असताना करिना कपूर मुंबईतच दिसली. नुकतीच तिने ऋतुजा दिवेकरचे 'प्रेग्नेंसी नोट्स : ...
it's shocking : सारा अली खानच्या डेब्यूवर काय म्हणाली करिना कपूर?
सगळे बॉलिवूड 18व्या आयफा पुरस्कारासाठी न्यूयॉर्कला गेले असताना करिना कपूर मुंबईतच दिसली. नुकतीच तिने ऋतुजा दिवेकरचे 'प्रेग्नेंसी नोट्स : बिफोर, ड्युरिंग अॅण्ड आफ्टर' या पुस्तकाचे लाँचिंग केले. या पुस्तकाच्या लाँचिंग दरम्यान करिनाला सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यू बाबत प्रश्न विचारण्यात आले. साराला बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी तू कोणत्या टिप्स देऊ इच्छिते, मी काही टीचर नाही साराला टीप्स द्यायला तसेच तिला माझ्या कोणत्याही टीप्सची गरज देखील नाही. कारण अभिनय तिच्या रक्तातच आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये ती धमाका करण्यास तयार आहे. तसेच करिनाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले साराच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन ती फारच कॉन्फिडेंट आहे. तिला आशा आहे की सारा बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण करेल. सारा अली खान ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. सारा बॉलिवूडमध्ये अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ चित्रपटातून डेब्यू करण्यास सज्ज आहे. यात सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. याआधी अशी चर्चा होती की सारा करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ इअर 2 मधून डेब्यू करणार आहे मात्र ही बातमी केवळ अफवा ठरली. साराने अभिषेकसोबत जाऊन उत्तरखंडमधल्या केदारनाथचे दर्शन देखील घेतले आहे. त्यावेळीचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या आधीच सारा स्टार बनली आहे. नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 18 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सुद्धा साराने हजेरी लावली होती.