Join us

It's Confirm : ‘गोलमाल ४’ मध्ये परीची होणार एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 16:52 IST

‘गोलमाल ४’ मध्ये मुख्य भूमिकेतील अभिनेत्री कोण असणार? हा मुद्दा आता ऐरणीचा विषय बनला आहे. प्रथम करिना कपूर खान ...

‘गोलमाल ४’ मध्ये मुख्य भूमिकेतील अभिनेत्री कोण असणार? हा मुद्दा आता ऐरणीचा विषय बनला आहे. प्रथम करिना कपूर खान नंतर श्रद्धा कपूर यांच्या नावांची वर्णी लागली होती. पण आता मात्र तिसरेच नाव समोर येतांना दिसतेय? सध्या जी बॉलिवूडची ‘जानेमन गर्ल’ झालीये... अहो ती म्हणजे परिणीती चोप्रा.‘मेरी प्यारी बिंदू’ आणि ‘ताकादुम’ या चित्रपटांमध्ये जी सध्या तिच्या झीरो फिगरने मिरवताना दिसतेय. तिने म्हणे नुकतेच ‘गोलमाल अगेन’ या दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट साईन केला आहे. रोहित शेट्टी परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांपैकी एका अभिनेत्रीची निवड करायची म्हणून गोंधळात पडला होता. पण, परीचा चित्रपटाच्या बाबतीतील उत्साह पाहून तिला या चित्रपटासाठी निवडणेच निश्चित केले आहे. चित्रपटात परिणीतीची भूमिका ही बबली गर्लप्रमाणे असणार असल्याने खासकरून तिची निवड करण्यात आल्याचे कळते आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत श्रद्धाने ही भूमिका नाकारल्याचे स्पष्ट केले आहे. पण अशा प्रकारच्या कॉमेडी चित्रपटाचा भाग व्हायला आवडले असते असेही तिने कबूल केले आहे.