Join us  

अनेक महिन्यांच्या उपचारानंतर घरी परतणार इरफान खान, कुटुंबासोबत साजरी करणार दिवाळी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 12:49 PM

 बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अनेक महिने लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मायदेशी परतण्यास तयार आहे.  ही दिवाळी तो कुटुंबासोबत साजरी करणार आहे.

 बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अनेक महिने लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मायदेशी परतण्यास तयार आहे.  ही दिवाळी तो कुटुंबासोबत साजरी करणार आहे. नाशिकच्या फार्महाऊसवर इरफान दिवाळी सेलिब्रेशन करेल, असेही कळतेय.इरफानचे उपचार पूर्णपणे संपले नाहीत. पण उपचारादरम्यान १० दिवसांचा बे्रक घेऊन तो भारतात येणार आहे. भारतात काही दिवस घालवल्यानंतर तो पुन्हा लंडनला परतेल.  मध्यंतरी इरफान मुंबईत परतून ‘हिंदी मीडियम 2’चे शूटींग सुरू करणार, अशी बातमी होती. पण इरफानच्या प्रवक्त्याने ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. अर्थात इरफान लवकरच भारतात परतणार असल्याचे संकेत या प्रवक्त्याने दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अद्याप डॉक्टरांनी इरफानला पूर्णपणे काम करण्याची परवानगी दिलेले नाही. पण येत्या मार्चपर्यंत इरफान कामावर परतू शकेल, असे मानले जात आहे. पण यादरम्यानही त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. गत मार्चमध्ये  इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.  त्याने एक सावलीचा फोटो शेअर करत सोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो.  तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

टॅग्स :इरफान खान