Join us

पाण्याखाली सेलिब्रेट केला इलियानाने बर्थडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 14:01 IST

सध्या इलियाना डिक्रुझ ही तिला मिळालेला रिलॅक्स वेळ एन्जॉय करतेय. आगामी कुठलेच प्रोजेक्ट तिच्या हातात नसल्याने तिचा फावला वेळ चित्रपटासंदर्भात मिटिंग्ज करण्यात घालवेतय

 सेलिब्रिटी काहीतरी हटके करण्याच्या नेहमीच विचारात असतात. तुमच्याआमच्याप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन केल्यावर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरणार? सेलिब्रिटींच्या बर्थडेला जंगी सेलिब्रेशन तर ठरलेलंच असतं. पण, ‘रूस्तम’ फेम अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने स्वत:चा बर्थडे पाण्याखाली सेलिब्रेट केलाय म्हणे.तिच्या या हटके बर्थडे सेलिब्रेट करण्यामागे कोण असेल याचा विचार केलाय का कधी? तिचा बॉयफ्रेंड आणि फोटोग्राफर अँण्ड्यू नीबोन यानेच तिचा बर्थडे स्पेशल करण्यासाठी विशेष तयारी केली होती म्हणे. हा बर्थडे तिचा आत्तापर्यंतचा सर्वांत मेमोरेबल बर्थडे होता. हटके बर्थडे सेलिब्रेट करण्यामुळे  ती एवढी उत्साहित होती की, तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.ज्याला तिने कॅप्शन दिलेय,‘अ‍ॅण्ड्यू नीबोन फोटोग्राफी टूक धीस फन व्हिडीओ टू शो मच फन आय हॅड आॅन माय बर्थडे! थँक यू आॅल फॉर द लव्ह अ‍ॅण्ड विशेस!! थर्टिज रॉक..इम्पार्टमर्मेड...वॉटरबेबी..’ सध्या इलियाना डिक्रुझ ही तिला मिळालेला रिलॅक्स वेळ एन्जॉय करतेय. आगामी कुठलेच प्रोजेक्ट तिच्या हातात नसल्याने तिचा फावला वेळ चित्रपटासंदर्भात मिटिंग्ज करण्यात घालवेतय...वेल, इलियाना एन्जॉय कर तुझं रिकामपण...!