Join us

इंडो-चायना बॉर्डरवर शाहीद-कंगणाचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 23:32 IST

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ याची शूटींग सध्या सुरू आहे. यात कंगणा राणावत, सैफ अली खान आणि ...

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ याची शूटींग सध्या सुरू आहे. यात कंगणा राणावत, सैफ अली खान आणि शाहीद कपूर यांच्यावर आधारित प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. शाहीद-कंगणा फराह खान यांनी कोरिओग्राफ केलेल्या ‘एक दूनी दो’ या गाण्यावर इंडो-चायना बॉर्डरवर रोमान्स करत आहेत. हे गाणे १९४० या वर्षातील सीनप्रमाणे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट वातावरणात शूट करण्यात आले आहे. या गाण्याच्या शूटींगचे विशेष म्हणजे एका टेकमध्येच हे गाणे शूट केले आहे. कंगणा बॉब कट आणि लाल रंगाच्या स्कर्ट मध्ये दिसत आहे आणि शाहीद नॉर्थ-ईस्टर्न ड्रेसिंगमध्ये होता. भारद्वाजचा ‘रंगून’ हा ड्रीम प्रोजेक्ट असून गेल्या सात वर्षांपासून तो रंगूनचे स्वप्न पाहतोय. आत्तापर्यंतचा त्यांचा हा सर्वांत महागडा चित्रपट असणार आहे.