Join us

​अक्षयसाठी ‘धोनी’साकरणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 12:59 IST

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना वाटते की, धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार निवड करणे ...

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना वाटते की, धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार निवड करणे अशक्य होते. अक्षयच्या अभिनय कौशल्यावर प्रश्न उपस्थित केल्यासारखे वाटू देऊ नका. ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर धोनी जीवनपटातही अक्षयला रोल का आॅफर केला नाही असे विचारल्यावर नीरज म्हणाला की, ‘अक्षय उत्तम अभिनेता आहे यामध्ये कोणाचे दुमत नाही. परंतु चित्रपटच्या पटकथेनुसार अक्षयला १५-१६ वर्षांचा मुलगा दाखवणे तितके संयुक्त वाटले नसते. प्रत्येक भूमिकेच्या काही गरजा असतात, त्यानुसारच अभिनेत्याची निवड करण्यात येते.’ चित्रपटात सुशांतसिंग राजपुत धोनीची भूमिका साकरत आहे. टीसी ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असा धोनीचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.